Elon Musk : राज्‍यशास्‍त्राच्‍या पंडितांपेक्षा इलेक्‍ट्रिशियन्‍स् आणि प्‍लंबर्स अधिक मोलाचे ! – इलॉन मस्‍क

इलॉन मस्क

ऑस्टिन (अमेरिका) – इलेक्‍ट्रिक वाहन उत्‍पादनात अग्रेसर असलेल्‍या ‘टेस्‍ला कंपनी’चे संस्‍थापक आणि ‘सीईओ’ अब्‍जाधीश इलॉन मस्‍क यांनी राज्‍यशास्‍त्राच्‍या पंडितांपेक्षा इलेक्‍ट्रिशियन्‍स् आणि प्‍लंबर्स अधिक मोलाचे असल्‍याचे म्‍हटले आहे. इलॉन मस्‍क यांच्‍या या विधानाचा व्‍हिडिओ सध्‍या चर्चेत आला आहे. तसेच जीवनात यशस्‍वी होण्‍यासाठी आपण चार वर्षे  महाविद्यालयात शिक्षण घेतले पाहिजे हा विचार मनात नसावा, असेही इलॉन मस्‍क यांनी म्‍हटले आहे.

१. इलॉन मस्‍क यांनी म्‍हटले आहे, ‘राज्‍यशास्‍त्राच्‍या पंडितांपेक्षा इलेक्‍ट्रिशियन्‍स् आणि प्‍लंबर्स अधिक मोलाचे आहेत असे वाटते; कारण जे हाताने काम करतात त्‍यांच्‍याविषयी मला कायम आदर आहे. सध्‍याच्‍या काळात आम्‍हाला इलेक्‍ट्रिशियन्, प्‍लंबर आणि सुतार यांची आवश्‍यकता आहे; कारण हे खूप महत्त्वाचे आहे.

२. जीवनात यशस्‍वी होण्‍यासाठी तुमच्‍याकडे चार वर्षे महाविद्यालयात शिक्षण घेतले  पाहिजे किंवा ते आवश्‍यकच आहे, हा विचार आपल्‍या मनात नसला पाहिजे; कारण ते अजिबात खरे नाही, असे इलॉन मस्‍क यांनी म्‍हटले आहे.