पुणे येथे ‘ग्राईडर अ‍ॅप’चा वापर करून तरुणांना लुटणार्‍या टोळीला अटक !

टोळीमध्ये ३ अल्पवयीन मुलांचा समावेश

ग्राईडर अ‍ॅप

पुणे – ‘ग्राईडर अ‍ॅप’चा उपयोग करून समलिंगी तरुणांना निर्जनस्थळी बोलावून लुटमार करणार्‍या टोळीला पोलिसांनी अटक केली. टोळीचा १९ वर्षीय सूत्रधार भारत धिंडले यांच्यासह ३ अल्पवयीन मुलांना कह्यात घेतले आहे. या प्रकरणी ३२ वर्षीय हॉटेल व्यावसायिकाने पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट केली होती. आरोपी तरुण समलैंगिक लोकांशी ‘ग्राईडर अ‍ॅप’द्वारे मैत्री करतात. त्यांना निर्जनस्थळी भेटायला बोलतात. संबंधित व्यक्ती आल्यानंतर या मुलांचे साथीदार अचानक हातात कोयता आदी हत्यारे घेऊन येतात. धाक दाखवून पैसे, भ्रमणभाष, सोने, महत्त्वाचा ऐवज लुटून पसार होतात. (गुन्हेगार पोलिसांच्या पुढे असणे, हे पोलिसांसाठी लज्जास्पद ! – संपादक)

संपादकीय भूमिका

अल्पवयीन मुलांना धर्मशिक्षण नसल्यामुळे संस्कारहिन झाल्याचा दुष्परिणाम !