|
संभल (उत्तरप्रदेश) : येथील शाही जामा मशीद परिसरात जिल्हा प्रशासनाने १४ डिसेंबरला सकाळपासून अतिक्रमण आणि वीजचोरी यांविरोधात धडक मोहीम राबवली. ही कारवाई चालू असतांना येथे महमूद खा सराय भागात ४६ वर्षांपासून बंद असलेले शिवमंदिर सापडले. या मंदिरात शिवलिंग, श्री हनुमान, श्री कार्तिकेय यांच्या मूर्ती सापडल्या. प्रशासन आणि पोलीस यांनी हे मंदिर उघडले आहे. हे मंदिर वर्ष १९७८ च्या हिंदू-मुसलमान दंगलीच्या वेळी बंद करण्यात आले होते. या दंगलीनंतर या परिसरातील २० ते २५ हिंदु कुटुंबांनी पलायन केले होते. त्यांच्यापैकी एका हिंदु कुटुंबाचे हे मंदिर होते. त्यांनी हे मंदिर विकले आणि तेव्हापासून ते बंद होते. येथील समाजवादी पक्षाचे खासदार झिया उर रहमान बर्क यांच्या घरापासून हाकेच्या अंतरावर हे मंदिर आहे. (असे असूनही त्यांनी या मंदिराच्या संवर्धनासाठी काहीही केले नाही. यातून समाजवादी पक्षाची आणि त्यातही मुसलमान खासदारांची मानसिकता कशी आहे, हे लक्षात येते ! – संपादक) जिल्हा दंडाधिकारी राजेंद्र पेन्सिया आणि पोलीस अधीक्षक कृष्ण कुमार बिष्णोई यांच्या देखरेखीखाली मंदिराची स्वच्छता करण्यात आली आणि येथे बांधकाम करून लपवण्यात आलेली विहीर उघड करण्याचे काम चालू आहे. या घराच्या मालकाचा शोध घेण्यात येत आहे. पुरातत्व विभागाला मंदिराची तपासणी करण्यासाठी कार्बन डेटिंग (या चाचणीतून संबंधित वस्तू किती जुनी आहे, ते तपासले जाते) करण्यास सांगण्यात आले आहे.
१. वीजचोरीच्या विरोधातील या मोहिमेत ३०० हून अधिक घरांमध्ये वीजचोरी आढळून आली. यांमध्ये अनेक मशिदींचाही समावेश आहे. एका मशिदीतील ५९ पंखे, एक शीतकपाट, कपडे धुलाई यंत्र (वॉशिंग मशीन) आणि २५ ते ३० ‘लाईट पॉइंट’ (जेथून घरात किंवा इमारतींमध्ये वीज प्रवाहित केली जाते, ते ठिकाण) वीजचोरी करून चालवले जात असल्याचे पथकाला आढळून आले.
२. वीज विभागाचे कार्यकारी अभियंता नवीन गौतम यांनी सांगितले की, दोषींवर कारवाई करण्यात येत आहे. विद्युत् विभागाच्या पथकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी या परिसरात पोलिस दलाच्या २ तुकड्या तैनात केल्या आहेत.
३. जिल्हाधिकारी म्हणाले की, संभल शहर हे सर्वाधिक वीजचोरी करणारा भाग म्हणून कुप्रसिद्ध आहे. येथे प्रतिमहा कोट्यवधी रुपयांची वीज चोरी होत असते. त्यामुळे येथे सकाळपासून ही कारवाई चालू करण्यात आली आहे. अतिक्रमणेही हटवली जात आहेत. वीजचोरीच्या विरोधातील कारवाईच्या वेळी अतिक्रमणामुळे बंद पडलेले मंदिर आढळून आले.
#WATCH | Sambhal, UP: Sambhal CO Anuj Kumar Chaudhary says, “We had received information that a temple in the area was being encroached upon. When we inspected the spot, we found a temple there.” https://t.co/APfTv9dpg8 pic.twitter.com/ZhVpqR4or7
— ANI (@ANI) December 14, 2024
४. अतिरिक्त पोलीस अधीक्षक श्रीश चंद्र यांनी सांगितले की, कोणत्याही धार्मिक स्थळावर किंवा सार्वजनिक मालमत्तेवर होणारे अतिक्रमण खपवून घेतले जाणार नाही. अतिक्रमण करणार्यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.
भीतीमुळे मंदिराच्या पूजेसाठी पुजारी रहाण्याचे धाडस करत नव्हता !नगर हिंदू सभेचे संरक्षक विष्णु शरण रस्तोगी यांनी सांगितले की, आम्ही खग्गु सराय भागात रहात होतो. वर्ष १९७८ नंतर आम्ही आमचे घर विकले. येथे भगवान शिवाचे मंदिर होते. आम्हाला या मंदिराची काळजी घेता आली नाही. या ठिकाणी एकही पुजारी रहात नाही. पुजार्याचे येथे रहाण्याचे धाडस नव्हते. (मुसलमानबहुल भागांत हिंदू रहाण्यास घाबरतात, तर हिंदुबहुल भागात मुसलमान दादागिरी करत रहातात ! – संपादक) तेव्हापासून मंदिर बंद होते आणि आज ते उघडले आहे. पोलिसांमुळे मंदिर उघडले गेले. |
संपादकीय भूमिका
|