Illegal Bangladeshis Arrested : देहलीत तृतीयपंथी म्हणून वावरणार्‍या ५ बांगलादेशी घुसखोरांना अटक

देहली – शहरातील जहांगीरपुरीमध्ये पोलिसांनी ५ बांगलादेशी घुसखोरांना अटक केली. हे लोक त्यांची ओळख लपवण्यासाठी ट्रान्सजेंडर (लिंगपरिवर्तन करणारे, तृतीयपंथी आदींशी निगडित संज्ञा) झाले होते. पोलिसांनी त्यांना पकडले आणि त्यांना हद्दपार करण्याची सिद्धता चालू केली आहे.

१. पोलिसांनी सापळा रचून महंमद शकीदुल (वय २४ वर्षे, शेरपूर), दुलाल अख्तर उपाख्य हजेरा बीबी (वय ३६ वर्षे, जमालपूर), अमीरुल इस्लाम उपाख्य मोनिका (वय ३१ वर्षे, ढाका), माहिर उपाख्य माही (वय २२ वर्षे, तांगेल) आणि सद्दाम हुसेन उपाख्य रुबिना (वय ३० वर्षे) यांना अटक केली.

२. बांगलादेशी घुसखोरांकडून ७ भ्रमणभाष जप्त करण्यात आले. या भ्रमणभाषमध्ये आय.एम्.ओ. ॲप इन्स्टॉल करण्यात आले होते. या ॲपचा वापर करून शकीदुल बांगलादेशातील त्याच्या कुटुंबाशी गुप्तपणे बोलत असे.

३. हे लोक दलालांच्या साहाय्याने भारतात घुसले होते. भारतात अवैधपणे रहात असतांना पकडले जाऊ नये; म्हणून त्यांनी हार्मोनल इंजेक्शन्स आणि शस्त्रक्रियांचा अवलंब केला आणि लिंगपरिवर्तन केले.

४. हे घुसखोर रेल्वेगाडीने देहली येथे पोचले आणि भीक मागत होते.

५. ‘घुसखोरांनी केवळ उदरनिर्वाहासाठी लिंगपरिवर्तन केले कि त्यामागे काही वेगळेच कारण होते ?’, याचा पोलीस शोध घेत आहेत.

संपादकीय भूमिका

अशांना भारतात घुसखोरी करण्यासाठी साहाय्य करणार्‍यांची नावे कधीच समोर येत नाहीत. सरकारने त्यांचीही नावे समोर आणून त्यांना फाशीची शिक्षा दिली पाहिजे, तरच घुसखोरांना घुसखोरीसाठी साहाय्य करण्याचे पुन्हा कुणाचे धाडस होणार नाही !