मुंबई – विधीमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे ९ डिसेंबर या दिवशी विधानसभेच्या अध्यक्षपदाची निवड होणार आहे. या दिवशी सकाळी प्रलंबित लोकप्रतिनिधींचा शपथविधी झाल्यानंतर सभागृहात महायुती बहुमत सिद्ध करील. त्यानंतर मतदानाद्वारे अध्यक्षपदाची निवड केली जाईल. सद्य:स्थितीत विधानसभेत महायुतीचे २३७ आमदार आहेत. त्यामुळे विधानसभेच्या अध्यक्षपदी अधिवक्ता राहुल नार्वेकर यांची निवड निश्चित मानली जात आहे.