पुरुलिया (बंगाल) – येथील मुराडीह भागात धर्मप्रेमी युवकांसाठी ‘हिंदु राष्ट्र-जागृती बैठक’ आयोजित करण्यात आली होती. या वेळी हिंदु जनजागृती समितीचे पूर्व आणि पूर्वोत्तर भारताचे समन्वयक श्री. शंभू गवारे यांनी ‘हिंदु राष्ट्राची मूलभूत संकल्पना आणि हिंदु राष्ट्राच्या स्थापनेची आवश्यकता’, यांविषयी उपस्थितांना माहिती सांगितली. या वेळी ‘राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करतांना साधना का करावी ? आणि ती कशी करावी ?’, यांविषयी समितीचे श्री. विकास सिंह यांनी माहिती सांगितली. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी नियमित धर्मशिक्षण वर्गाची मागणी केली. ही बैठक पुरुलिया येथील धर्मप्रेमी श्री. सुकुमार चार आणि श्री. लक्ष्मण पांडे यांनी आयोजित केली. या बैठकीला मोठ्या प्रमाणात धर्मप्रेमी युवक उपस्थित होते.
वैशिष्ट्यपूर्ण
बंगालच्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये रहात असलेल्या पुरुलिया येथील हिंदु युवकांमध्ये राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य करण्याविषयी चांगली तळमळ दिसून आली.