पुणे – घरात शिकवणीसाठी आलेल्या ८ वर्षीय शाळकरी मुलीशी अल्पवयीन मुलाने अश्लील कृत्य केल्याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने तक्रार केली होती. येरवडा भागातील एका महिलेकडे खासगी शिकवणीसाठी पीडिता जात होती. शिक्षिकेच्या १४ वर्षीय चुलतभावाने आठवड्यापूर्वी शिक्षिका घरी नसल्याने मुलीला गच्चीवर नेऊन अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर २ दिवसांपूर्वीही तसाच प्रकार घडला. त्यानंतर घाबरलेल्या मुलीने घडलेला प्रसंग आईला सांगितला.
संपादकीय भूमिकामुलांवर चांगले संस्कार होण्यासाठी शाळेत नैतिक मूल्यांचे शिक्षण देणे आवश्यक ! |