‘मराठा लाईट इन्‍फंट्री रेजिमेंट’च्‍या वतीने १२ डिसेंबरला ‘अल्‍ट्रा मॅरेथॉन’ !

कोल्‍हापूर – वर्ष १९७१ च्‍या युद्धात प्राणांची आहुती देणार्‍या शूर सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करण्‍यासाठी विजय दिवसाचे आयोजन करण्‍यात येते. या निमित्ताने १०९ बटालियन, ‘मराठा लाईट इन्‍फंन्‍ट्री रेजिमेंट’, कोल्‍हापूरच्‍या वतीने १२ डिसेंबरला सकाळी ६ वाजता ‘अल्‍ट्रा मॅरेथॉन’चे आयोजन करण्‍यात आले आहे. यात कोल्‍हापूर शहरात वेगवेगळ्‍या मार्गांवरून एकूण ५० किलोमीटरचे हे मॅरेथॉन होणार आहे. यात कुणीही, कोणत्‍याही ठिकाणाहून आणि कितीही अंतरासाठी सहभागी होऊ शकतो. नागरिकांनी सहभागी होण्‍याचे आवाहन रेजिमेंटने केले आहे. याचा प्रारंभ तावडे हॉटेल येथून होईल. छत्रपती ताराराणी चौक, धैर्यप्रसाद चौक, भगवा चौक, पोलीस अधीक्षक कार्यालय, महावीर कॉलेज, जिल्‍हाधिकारी कार्यालय, सदर बझार चौक, कावळा नाका, अयोध्‍या टॉवर, शांती निकेतन चौक, विमानतळ, शिवाजी विद्यापीठ आणि शांतीनिकेतन परिसरात उर्वरित ५० किलोमीटरची धाव पूर्ण केली जाणार आहे.