मुंबई – राज्यात नवनियुक्त आमदारांच्या शपथविधीसाठी ७ ते ९ डिसेंबर या कालावधीत मुंबई येथे विधीमंडळाचे विशेष अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात ‘हंगामी अध्यक्ष’ म्हणून भाजपचे आमदार कालिदास कोळंबकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ६ डिसेंबर या दिवशी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी कालिदास कोळंबकर यांना विधानसभेच्या हंगामी अध्यक्षपदाची शपथ दिली.
कोळंबकर हे विधानसभेच्या निवडणुकीत सलग नवव्यांदा आमदार झाले आहेत. वर्ष १९९० पासून ते आमदार आहेत. अधिवेशनात हंगामी अध्यक्ष राज्यात निवडून आलेल्या २८८ आमदारांना विधानसभा सदस्यत्वाची आणि गोपनीयतेची शपथ देतील.