आयआयटी मुंबईतील पहिल्या वर्षातील विद्यार्थ्यांचा आरोप
मुंबई – आयआयटी मुंबईतील पहिल्या वर्षातील विद्यार्थ्यांचा आठवड्याभराचा अहवाल त्यांच्या पालकांना पाठवण्यात येतो. ‘यामुळे आमच्यावर दबाव येत असून हे आमच्या स्वातंत्र्याचे उल्लंघन आहे’, असा आरोप या विद्यार्थ्यांनी केला आहे. हे विद्यार्थी सध्या अप्रसन्न आहेत. ‘स्टुडंट मीडिया बॉडी’ने याविषयीचा अहवाल दिला आहे. याआधी विद्यार्थ्यांच्या संदर्भात घडलेल्या अनुचित घटना पहाता पालकांना त्यांच्या पाल्यांवर लक्ष ठेवणे सोपे जावे, यासाठी असा पर्याय विद्यापिठाने काढला आहे.