कसे होऊ उतराई श्री गुरुमाऊली ।

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

‘सुंदर तुमचे मनोहारी रूप ।
वदनावरी सदैव हास्‍य सुंदर ॥ १ ॥

आहे तुमची कीर्ती दिगंतात ।
विसावते हे रूप साधकांच्‍या हृदयात ॥ २ ॥

ब्रह्मांड विसावले तुमच्‍या चरणी ।
तुमच्‍या गुणांची ही यशोगाथा ॥ ३ ॥

राही सदैव मुखी साधकांच्‍या ।
एक आधारू सकल जनांचे ॥ ४ ॥

सौ. गौरी जोशी

अवतार तुम्‍ही श्रीराम अन् श्रीकृष्‍ण रूपाचे ।
साधकांचे रक्षणकर्ते गुरुदेव आमुचे ॥ ५ ॥

हृदय मंदिरात सदैव राहो नाम तुमचे ।
द्यावा आशीर्वाद सकल साधकांना ॥ ६ ॥

या जन्‍मी होवो मोक्ष प्राप्‍त सकलांना ।
तुमच्‍या रूपे परब्रह्म सगुणात आले ॥ ७ ॥

साधकांना उद्धरण्‍या देह तुम्‍ही खर्चिला ।
केवळ साधकांचाच विचार असेे मनी आपुल्‍या ॥ ८ ॥

कसे होऊ उतराई श्री गुरुमाऊली ।
कसे होऊ उतराई श्री गुरुमाऊली ॥ ९ ॥

– गुरुसेविका,

सौ. गौरी विद्याधर जोशी, नागपूर (९.६.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक