‘निर्विचार’, हा नामजप करतांना माझे ध्यान लागते. माझ्या मनाची निर्विचार स्थिती होऊन मला शांती जाणवते. ‘ही स्थिती कोणती आहे ?’, याचा अभ्यास केल्यावर देवाने मला सुचवले, ‘ही ब्रह्मस्थितीतील शांतीची अनुभूती आहे.’ ज्ञानयोगी पू. अनंत आठवले यांच्या ‘गीताज्ञानदर्शन’ या ग्रंथात त्यांनी लिहिले आहे, ‘निर्विचार ध्यानात निर्विचार ब्रह्मासारखी स्थिती होते, म्हणजे ब्रह्माशी योग होतो.’ (आत्मसंयमयोग (ध्यानयोग), अध्याय ६)
‘हे गुरुदेवा, ‘या अज्ञानी जिवाला तुम्ही ब्रह्मस्थिती (निर्विचार स्थिती) अनुभवायला दिल्याबद्दल तुमच्या कोमल चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. प्रज्ञा चेतन परब, फोंडा, गोवा. (११.३.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |