ऐसे कार्य करणार्‍या गुरूंची थोरवी काय वर्णावी ।

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्याविषयी काव्य – ‘राष्ट्र आणि धर्म कार्य’

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

काय वर्णावी आमच्या गुरूंची महती ।
प्रत्यक्ष श्रीविष्णु
अवतरला भूवरी (टीप १) ।। १ ।।

सद़्‍गुरु राजेंद्र शिंदे

हिंदु बांधव बहु पिडला ।
अन्यायाच्या चरखात अडकला ।। २ ।।

कोण तारणहार शोधत फिरला ।
घोर अंधःकारात कुणी न दिसला ।। ३ ।।

अशा हिंदूंच्या साहाय्यासी धावला ।
दयावंत कृपावंत भगवंत अवतरला ।। ४ ।।

निद्रिस्त हिंदु बांधवांमध्ये ।
जागृतीचे बीज पेरे ।। ५ ।।

आपत्काळा जाण्या सामोरे ।
हिंदूसंघटनाचे महत्त्व बिंबवे ।। ६ ।।

अनेक ध्येयांत हिंदुत्वनिष्ठ अडकले ।
‘माझेच ध्येय श्रेष्ठ’ असे तयां वाटे ।। ७ ।।

मानसिक अन् बौद्धिक स्तरांवरील कार्य हे ।
ईश्वरी अधिष्ठानाविना अडकले ।। ८ ।।

परि निराकरण सर्व समस्यांचे ।
‘हिंदु राष्ट्र’ स्थापना हेच असे ।। ९ ।।

ऐसे राष्ट्रगुरु (टीप २) पुनःपुन्हा सांगी ।
हिंदु अधिवेशनाच्या (टीप ३) माध्यमे पटवूनी देई ।। १० ।।

मनावर तयांच्या हे सतत बिंबवूनी ।
अन् साधनेचे महत्त्व सांगूनी ।। ११ ।।

हिंदु धर्माचे महत्त्व विशद करूनी ।
धर्मपालन करण्या सांगूनी ।। १२ ।।

समर्थ परंपरा क्षात्रधर्माची कथूनी ।
क्षात्रतेज तयांचे जागृत करी ।। १३ ।।

परिणाम याचा दिसू लागला ।
हिंदू आता जागृत झाला ।। १४ ।।

स्वसामर्थ्य जाणू लागला ।
जाणूनी भगवंताचे अधिष्ठान शरण तया गेला ।। १५ ।।

आता सिद्ध होतसे समर्थ धर्मनिष्ठ ।
साकारण्या स्वप्नातील हिंदु राष्ट्र ।। १६ ।।

ऐसे कार्य करणार्‍या गुरूंची थोरवी काय वर्णावी ।
अल्प पडे गती माझी अल्प पडे मति ।। १७ ।।

इदं न मम ।
सच्चिदानंद परब्रह्म गुरुचरणार्पणमस्तु ।

टीप १ – सप्तर्षी ‘जीवनाडीपट्टी’, तसेच विविध नाडीभविष्य ग्रंथांमध्ये ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले हे श्रीविष्णूचे अवतार आहेत’, असे सांगितले आहे.

टीप २ – ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले ‘आदर्श राष्ट्र रचना कशी करावी ?’, याविषयी समाजास केवळ मार्गदर्शन करत नसून, त्यासाठी हिंदुत्वनिष्ठांकडून प्रत्यक्ष कृती करवून घेत आहेत. त्यामुळे ते खर्‍या अर्थाने राष्ट्रगुरु आहेत.

टीप ३ – हिंदूंचे प्रभावी संघटन करून त्यांना योग्य दिशा देण्यासाठी प्रतीवर्षी गोवा येथे ‘अखिल भारतीय हिंदू अधिवेशन’ घेण्यात येते. वर्ष २०२३ पर्यंत ११ अधिवेशने झाली आहेत. त्यात शेकडो हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि विचारवंत सहभागी झाले होते.

– सद्गुरु राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (५.७.२०२३, रात्री ९ वाजता)