RSS Chief Mohan Bhagwat : संतांच्या रक्षणाचे कार्य रा.स्व. संघ करतो !

शस्त्रांची आवश्यकता असल्याचेही केले स्पष्ट !

प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत

चित्रकूट (उत्तरप्रदेश) – संत आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघात फारसा फरक नाही. संत मंदिरात पूजा करतात, तर संघाचे कार्यकर्ते बाहेर राहून त्यांच्या सुरक्षेत गुंतलेले असतात. संतांच्या कार्यात कोणताही अडथळा येऊ नये, त्यामुळे दंडुका हाती घेत संतांचे संरक्षण करणे, हे संघाचे काम आहे. आपल्याला शस्त्रांची आवश्यकता आहे. याखेरीज ते धारण करणार्‍यांचे विचारही रामाचे असावेत, असे मार्गदर्शन प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी येथे एका कार्यक्रमात केले.

प.पू. सरसंघचालक म्हणाले की,

१. जेव्हा सत्याची वेळ येते, तेव्हा संत धैर्याने बोलतात. संतांचे दैवी विचार ऐकल्यानंतर त्यांचे शब्द कडू पावडरसारखे असले, तरी जीवन सुधारते.

२. काही शक्ती भारताला दडपण्याचा प्रयत्न करत आहेत; पण सत्य कधीच दाबले जात नाही.

३. सनातन धर्माचे अनुयायी केवळ भारतातच नाही, तर परदेशातही सनातन धर्माचा गौरव करत आहेत. कर्तव्याच्या मार्गाला चिकटून रहा आणि सत्यासाठी कार्यरत रहा. असत्य काही काळ गोंधळ पसरवू शकते; परंतु सत्याचा विजय होईल.

४. प्रत्येक कुटुंबात राष्ट्रवाद आणि एकतेची भावना जागृत केल्यास देश शक्तीशाली होईल.