सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘ब्रह्मोत्सव’ सोहळ्याच्या संदर्भात केलेल्या वैज्ञानिक संशोधनाविषयी सौ. मधुरा कर्वे यांनी विचारलेले बुद्धीअगम्य प्रश्न आणि श्री. राम होनप यांनी सूक्ष्मातून मिळालेल्या ज्ञानाद्वारे दिलेली त्यांची उत्तरे !

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी परिधान केलेले सर्व वस्त्रालंकार चैतन्याने भारित करण्यासाठी रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमाच्या परिसरातील श्री सिद्धिविनायक मंदिरात ठेवण्यात आले होते. या वस्त्रालंकारांच्या मंदिरात आध्यात्मिक स्तरावरील उपायांना ठेवण्यापूर्वी, मंदिरात १० ते १२ घंटे उपायांसाठी ठेवल्यानंतर आणि ब्रह्मोत्सवानंतर (म्हणजे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी ब्रह्मोत्सवात वस्त्रालंकार परिधान केल्यानंतर) या टप्प्यांप्रमाणे चाचण्या करण्यात आल्या.            

(भाग ४)

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/846137.html

‘ब्रह्मोत्सव’ सोहळ्यातील एक क्षण

प्रश्न क्र. १०

सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे वस्त्रालंकार चैतन्याने भारित करण्यासाठी १० ते १२ घंटे श्री सिद्धिविनायक मंदिरात ठेवल्यानंतर त्यांमध्ये सहस्रो मीटर सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली. यामागील कारण काय ?

१० अ. उत्तर 

१० अ १. ७ व्या पाताळातील ‘तंत्रशिखर’ आणि ‘तंत्रमेरु’ या वाईट शक्तींकडे ब्रह्मोत्सवात अडथळे आणण्याचे उत्तरदायित्व असणे : ‘७ व्या पाताळात तंत्रयोगानुसार साधना करणारे आणि गुप्त विद्यांचे अधिपती असलेले ‘तंत्रशिखर’ अन् ‘तंत्रमेरु’, या  २ वाईट शक्ती आहेत. त्यांच्याकडे ब्रह्मोत्सवात अडथळे आणण्याचे उत्तरदायित्व होते.

सौ. मधुरा कर्वे

१० अ २. तंत्रशिखर आणि तंत्रमेरु या वाईट शक्तींचे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या वस्त्रालंकारांवर सूक्ष्मातून आक्रमणे करण्याचे नियोजन असणे : ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर धर्मरक्षणाचे कार्य अविरत करत आहेत. ते अवतारस्वरूप असल्याने त्यांच्यावर वाईट शक्तींच्या सूक्ष्मातून केलेल्या आक्रमणांचा काहीही परिणाम होत नाही’, हे लक्षात आल्यावर ‘तंत्रशिखर’ आणि ‘तंत्रमेरु’ या वाईट शक्तींनी सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या वस्त्रालंकारांवर सूक्ष्मातून आक्रमणे करण्याचे नियोजन केले होते. ‘ब्रह्मोत्सवाच्या निमित्ताने सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांसाठी वस्त्रालंकार कधी आणणार आहेत ? कुठून आणणार आहेत ?’, यांकडे तंत्रशिखर आणि तंत्रमेरु या वाईट शक्तींनी पाताळात राहून सूक्ष्मातून लक्ष दिले.

१० अ ३. पाताळातील आसुरी तंत्रविद्येत ‘व्यक्तीला वस्त्रालंकारांच्या माध्यमातून ज्वर, पीडा आणि विषारी वायू यांद्वारे त्रास कसा द्यायचा ?’, याविषयीचा एक पाठ आहे. 

१० अ ४. तंत्रातील ‘पाठ’ कसा असतो ? : तंत्रात ‘शिव-आवाहन’ या नावाचा सूक्ष्मातील एक ग्रंथ आहे. त्यात ‘भेदमंत्र’ या नावाचा एक पाठ आहे. हा पाठ सलग २८ दिवस करायचा असतो. त्यात मंत्रांची रचना पुढीलप्रमाणे असते -प्रथम दोन ओळींचा अर्धा मंत्र असतो. त्यानंतर त्याच मंत्रातील शब्दांचा उलट क्रम असलेल्या २ ओळींचा अर्धा मंत्र असतो. या चार ओळींतून एक मंत्र पूर्णपणे सिद्ध होतो. या एका मंत्रातून एक बंध (म्हणजे एक सूक्ष्म रचना) सिद्ध होतो. त्या पाठात असे २८ मंत्र आहेत. हे २८ मंत्र २८ दिवस सतत म्हटले की, त्याचा एक पाठ होतो.

श्री. राम होनप

१० अ ५. तंत्रातील ‘भेदमंत्र’ या पाठाची फलश्रुती : कुठल्याही वाईट शक्तीने ‘भेदमंत्र’ असलेला पाठ २८ दिवस केल्यास त्याला ‘जरज्वरा’ ही आसुरी सिद्धि प्राप्त होते. त्या वाईट शक्तीला ‘जरज्वरा’ या सिद्धीद्वारे व्यक्तीच्या वस्त्रालंकारांवर प्रभाव निर्माण करता येतो. त्या प्रभावामुळे व्यक्तीने वस्त्रालंकार धारण केल्यावर तिला ‘ज्वर येणे, एखादी व्याधी होणे, अकारण शारीरिक पीडा होणे आणि विषारी वायूच्या निर्मितीमुळे श्वास घेण्यात अडथळे येणे’, असे त्रास होऊ लागतात.

१० अ ६. तंत्रशिखर आणि तंत्रमेरु या वाईट शक्तींनी ‘भेदमंत्रा’चा पाठ करणे : ब्रह्मोत्सवाच्या निमित्ताने सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांसाठीच्या वस्त्रालंकारांवर तंत्राचा प्रयोग करण्यासाठी तंत्रशिखर आणि तंत्रमेरु या वाईट शक्तींनी पाताळात ‘भेदमंत्रा’चा पाठ २८ दिवस केला होता. तो पाठ त्या २ वाईट शक्तींना सिद्ध झाला होता. त्यामुळे त्यांना ‘पाठसिद्ध’, असे म्हटले जाते. तंत्रशिखर आणि तंत्रमेरु या वाईट शक्तींनी तो पाठ २८ दिवस मनोभावे केल्याने पाताळभैरवीकडून त्यांना ‘जरज्वरा सिद्धि’ प्राप्त झाली.

१० अ ६ अ. जरज्वरा सिद्धि : ‘जर’ या शब्दाचा अर्थ ‘आध्यात्मिक’ आणि ‘ज्वरा’ या शब्दाचे अर्थ ‘ताप’ किंवा ‘त्रास’, असे आहेत. व्यक्तीत आध्यात्मिक ताप किंवा त्रास निर्माण करण्याची क्षमता असलेल्या सिद्धीला ‘जरज्वरा सिद्धि’, असे म्हणतात.

१० अ ६ अ १. जरज्वरा या सिद्धीचे वैशिष्ट्य : ‘आसुरी सिद्धीचा प्रयोग करण्यापूर्वी तिला विशिष्ट उद्देश देणे आणि ती कार्यरत करणे’, यांसाठी आवश्यक असलेले मंत्र वाईट शक्तींना म्हणावे लागतात; परंतु तंत्रशिखर अन् तंत्रमेरु या वाईट शक्तींना पाताळभैरवीकडून मिळालेली ‘जरज्वरा सिद्धि’ ही ‘स्वयंसिद्ध’ होती.

१० अ ६ अ १ अ. जरज्वरा सिद्धीला ‘स्वयंसिद्ध’ का म्हटले आहे ? : या सिद्धीद्वारे कार्य करण्यासाठी असुरांना विशिष्ट मंत्र म्हणावे लागत नाही आणि ती सिद्धि वाईट शक्तींच्या मनातील इच्छा ओळखून त्याप्रमाणे कार्य करते. त्यामुळे जरज्वरा सिद्धीला ‘स्वयंसिद्ध’, असे म्हटले आहे.

१० अ ७. तंत्रशिखर आणि तंत्रमेरु या वाईट शक्तींनी ज्वरजरा या आसुरी सिद्धीचा प्रयोग सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या वस्त्रालंकारांवर करण्याची अनुमती पाताळभैरवीकडून मिळवणे : तंत्रशिखर आणि तंत्रमेरु या वाईट शक्तींना जरज्वरा सिद्धि पाताळभैरवीकडून प्राप्त झाली; परंतु त्या सिद्धीचा प्रयोग सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या वस्त्रालंकारांवर करण्यासाठी त्या दोन वाईट शक्तींनापाताळभैरवीची अनुमती मिळवणे आवश्यक होते. ती मिळण्यासाठी तंत्रशिखर आणि तंत्रमेरु या वाईट शक्तींनी पाताळात सूक्ष्मातून एक यज्ञ केला. त्यावर प्रसन्न होऊन पाताळभैरवीने तंत्रशिखर आणि तंत्रमेरु या वाईट शक्तींना ज्वरजरा या आसुरी सिद्धीचा प्रयोग सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या वस्त्रालंकारांवर करण्याची अनुमती दिली.

१० अ ८. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या वस्त्रालंकारांवर तंत्राची बाधा होऊ नये’, यासाठी श्री सिद्धिविनायकाने केलेले साहाय्य : सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी ब्रह्मोत्सवात वस्त्रालंकार परिधान करण्यापूर्वी आध्यात्मिक उपायांसाठी (म्हणजे चैतन्याने भारित करण्यासाठी) ते रामनाथी आश्रम परिसरातील श्री सिद्धिविनायक मंदिरात ठेवण्यात आले होते. सच्िचदानंद परब्रह्म डॉक्टर धर्मरक्षणाचे कार्य निःस्वार्थी वृत्तीने अविरत करत आहेत; म्हणून त्यांच्यावर देवता प्रसन्न आहेत. कठीण प्रसंगी देवता स्वतःहून सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या रक्षणाचे उत्तरदायित्व घेतात. त्यामुळे सिद्धिविनायकाने ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या वस्त्रालंकारांवर वाईट शक्तींच्या तंत्राचा कुठलाच परिणाम होऊ नये आणि त्यांच्याभोवती ईश्वरी कवच निर्माण व्हावे’, यांसाठी वस्त्रालंकारांमध्ये पुष्कळ दैवी ऊर्जेची निर्मिती केली. त्या दैवी ऊर्जेत वाईट शक्तींच्या तंत्राशी लढण्याचे सामर्थ्य आहे; परिणामी तंत्रशिखर आणि तंत्रमेरु या वाईट शक्तींचा सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या वस्त्रालंकारांवर ‘जरज्वरा’ सिद्धीद्वारे तंत्रप्रयोग करण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला.

१० अ ९. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांवर वस्त्रालंकारांच्या माध्यमातून सूक्ष्मातून आक्रमण करण्याचे नियोजन फसल्यावर तंत्रशिखर आणि तंत्रमेरु या वाईट शक्तींवर झालेला परिणाम : ज्याप्रमाणे व्यक्तीच्या मनाविरुद्ध घडल्यावर तिला पुष्कळ राग येतो. तेव्हा ती व्यक्ती स्वतःचा राग ‘मोठ्याने ओरडणे, दात-ओठ खाणे किंवा हात-पाय आपटणे’, या कृतींद्वारे व्यक्त करते. त्याप्रमाणे तंत्रशिखर आणि तंत्रमेरु या वाईट शक्तींच्या मनाविरुद्ध घडल्यास त्यांचा राग पुढीलप्रमाणे व्यक्त होतो.

१० अ ९ अ. डोळ्यांतून रक्ताचे अश्रू वहाणे : ब्रह्मोत्सवात सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना वस्त्रालंकारांच्या माध्यमातून त्रास देण्याचे तंत्रशिखर आणि तंत्रमेरु या वाईट शक्तींचे नियोजन श्री सिद्धिविनायकामुळे फसले. तेव्हा या दोन्ही वाईट शक्तींच्या डोळ्यांतून रक्ताचे अश्रू येऊ लागले. त्या अश्रूंतून तंत्रशिखर आणि तंत्रमेरु या वाईट शक्तींची ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना काही त्रास देता आला नाही’, याविषयीची खंत अन् पराकोटीचा राग व्यक्त झाला.

१० अ ९ आ. वातावरणातील उष्णतेत अकस्मात् वाढ करणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना सूक्ष्मातून त्रास देण्यात अपयश आल्यावर तंत्रशिखर आणि तंत्रमेरु या वाईट शक्तींनी चिडून वातावरणात अनेक पटींनी त्रासदायक शक्तीचे प्रक्षेपण केले. त्यामुळे वातावरणातील उष्णता अकस्मात् वाढली. हा परिणाम वातावरणावर काही घंटे टिकून होता.’

(क्रमशः पुढच्या रविवारी)

– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२४.८.२०२३)

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.

सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग : काही साधक सूक्ष्मातील कळण्याच्या क्षमतेचा अभ्यास म्हणून ‘एखाद्या वस्तूविषयी मन आणि बुद्धी यांच्या पलीकडे काय जाणवते’, याची चाचणी करतात. याला ‘सूक्ष्म-ज्ञानाविषयीचा प्रयोग’ म्हणतात.