१. साधिकेने आणून दिलेले औदुंबराचे रोप तिच्या सांगण्याप्रमाणे सौ. संतोषी यांनी दक्षिण दिशेला ठेवणे
‘२.६.२०२४ दिवशी संध्याकाळी आमच्या घरी एक साधिका मला भेटायला आली होती. तिने येतांना औदुंबराचे एक रोप आणले होते. ती मला म्हणाली, ‘‘हे औदुंबराचे रोप आश्रमातून पाठवले आहे आणि ते दक्षिण दिशेला लावायला सांगितले आहे.’’ मी ते रोप आमच्या झोपायच्या खोलीच्या बाहेर खिडकीच्या बाजूला, म्हणजे दक्षिण दिशेला ठेवले.
२. सौ. संतोषी रात्री औदुंबराचे रोप ठेवलेल्या खिडकीपाशी गेल्यावर त्यांना उदबत्तीचा सुगंध येणे
रात्री आठच्या सुमारास मी अंथरूण घालायला खोलीत गेले. तेव्हा मला खिडकीपाशी गेल्यावर एक सेकंद उदबत्तीचा सुगंध आला. मला काहीच कळले नाही. मी तो सुगंध पुन्हा घेण्याचा प्रयत्न केला; पण पुन्हा तो सुगंध आला नाही. मी देव्हार्याकडे जाऊन ‘तेथून सुगंध येतो का ?’, ते पाहिले; परंतु तिथूनही तो सुगंध आला नाही. काही वेळाने माझ्या लक्षात आले, ‘बाहेर औदुंबराचे रोप ठेवले आहे; म्हणून मला तो सुगंध आला.’ तेव्हा मला पुष्कळ आनंद झाला. मी लगेच जाऊन मुलीला सांगितले. गुरुमाऊलींनी (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी) मला एवढी मोठी अनुभूती दिली की, मी शब्दांत सांगू शकत नाही.
३. सुगंधाची अनुभूती दिल्याविषयी कृतज्ञता वाटणे
साधक सत्संगात ‘त्यांना सुगंध आला’, अशा अनुभूती सांगतात; पण मी तसे कधी अनुभवले नव्हते. या वेळी गुरुमाऊलींनी मला प्रत्यक्ष सुगंध अनुभवायला दिला. ही अनुभूती मला दिली, यासाठी मी गुरुमाऊलींच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
४. ‘साधिकेच्या माध्यमातून गुरुमाऊलीच आपल्या वास्तूत येतात’, असा भाव असणे
औदुंबराचे रोप घेऊन आलेली ती साधिका आमच्याकडे येते. तेव्हा ‘गुरुमाऊलीच आमच्या वास्तूत येऊन त्यांच्या चरणांचा स्पर्श करून जातात’, असे मला वाटते. त्या वेळी माझी भावजागृती होते.
गुरुमाऊलींनी मला ही अनुभूती दिली आणि माझ्याकडून हे शब्द लिहून घेतले, त्यासाठी मी गुरुमाऊलींच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. संतोषी फळदेसाई, बाळ्ळी, गोवा. (१९.८.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |