पू. (सौ.) संगीता पाटील (सनातनच्या ८५ व्या (समष्टी) संत, वय ६५ वर्षे) यांचा मला सहवास लाभल्यानंतर खर्या अर्थाने माझ्या साधनेला प्रारंभ झाला. मी त्यांच्या समवेत सेवा करतांना त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.
१. साधकांना साधनेविषयी मार्गदर्शन करणे
पू. (सौ.) संगीता पाटीलकाकू केंद्रातील साधक आणि जिज्ञासू यांना साधनेविषयी मार्गदर्शन करतात. त्या साधकांच्या घरी गेल्यावर कुटुंबातील प्रत्येकाला प्रेमाने साधना सांगतात. पू. काकू म्हणतात, ‘‘आपल्याला गुरुमाऊलीचे मन जिंकायचे आहे. त्यासाठी मिळालेली सेवा मनापासून करूया.’’
पू. काकू ‘गुरुमाऊलीला हृदयात कसे साठवायचे ? त्यांची भक्ती कशी करायची ?’, याविषयी मार्गदर्शन करतात.
२. मी पू. काकूंनी सांगितल्यानुसार प्रयत्न केल्यावर माझे व्यष्टी आणि समष्टी साधनेचे प्रयत्न वाढले. मला साधनेतील आनंद मिळायला लागला.
३. पू. काकू समष्टीसाठी नामजपादी उपाय करतात. त्यामुळे साधकांवरील अनिष्ट शक्तीचे आवरण अल्प होऊन साधकांच्या सेवेतील अडथळे दूर होतात. साधकांचा उत्साह वाढून त्यांना आनंद मिळतो.
४. पू. काकूंशी बोलल्यावर मला हलकेपणा जाणवतो आणि त्यांच्या सहवासात आनंद मिळतो.
माझा देह आणि मन यांची शुद्धी करवून घेणार्या पू. (सौ.) पाटीलकाकूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करते.’
– सौ. कोमल इंगळे (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ५२ वर्षे), भोसरी, चिंचवड, पुणे. (१४.७.२०२४)
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. |