निपाणी, जिल्हा बेळगाव येथील साधिका कु. प्रेरणा महेश मठपती (वय १८ वर्षे) हिला दीपावलीच्या निमित्ताने सुचलेल्या काव्यमय शुभेच्छा येथे देत आहोत.
वसुबारसदिनी गोमातेचे पूजन करूनी ।
घेऊ तिच्याकडून ईश्वरप्राप्तीचा आशीर्वाद ।।
कामधेनू करी इच्छापूर्ती मागणे आमचे तिच्याकडे ।
लागो आम्हाला गुरुचरणांचा ध्यास ।। १ ।।
धन्वन्तरि असे देवतांचा वैद्य कृतज्ञ राहू त्याच्या प्रती ।
दिले तयाने आम्हा चांगले स्वास्थ्य साधनेसाठी ।।
पुढील आपत्काळातही निरोगी स्वास्थ्यासाठी ।
करू प्रार्थना धन्वन्तरीच्या चरणी ।। २ ।।
यमदीपदानाने टळो अपमृत्यू ।
साधकांची अशी प्रार्थना यमदेवा चरणी ।।
नरकासुररूपी स्वभावदोष नि अहं यांचा नाश करूनी ।
गुणांची सुगंधी पुष्पे अर्पण करू गुरुचरणी ।। ३ ।।
हिंदु राष्ट्राच्या महान लक्ष्यापर्यंत ।
नेण्या सज्ज श्री महालक्ष्मी ।।
गुणांचे दीप लावून अंतःकरणी ।
करूया स्वागत महालक्ष्मीचे ।। ४ ।।
होऊया समर्पित हिंदु राष्ट्रासाठी ।
द्यावे आम्हा सामर्थ्य त्यासाठी ।।
होवो आमच्या साधनेची भरभराट ।
हीच प्रार्थना श्री महालक्ष्मी चरणी ।। ५ ।।
नव्या उत्साहाने नव्या चैतन्याने नव्या आनंदाने ।
बसवूया घडी व्यष्टी आणि समष्टी साधनेची ।
दीपावलीतील प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊया ।
गुरूंना अपेक्षित अशी आध्यात्मिक दीपावली साजरी करूया ।। ६ ।।
सर्वांना दीपावलीचा भावपूर्ण नमस्कार ! शुभ दीपावली !
– कु. प्रेरणा महेश मठपती (वय १८ वर्षे), निपाणी, जिल्हा बेळगाव, कर्नाटक.
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |