पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांत, तसेच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांत दिवाळीनिमित्त ‘सनातनचे आकाशकंदिल आणि भेटसंच’ यांच्या वितरणासाठी साधकांनी वैशिष्ट्यपूर्ण प्रयत्न केले. त्यांपैकी पुणे जिल्ह्यातील साधकांनी केलेले प्रयत्न येथे दिले आहेत.
१. सिंहगड रस्ता
१ अ. सनातनच्या आकाशकंदिलाची माहिती ऐकून त्याची मागणी करणार्या आणि ग्रंथ अन् सात्त्विक उत्पादने घेणार्या सौ. प्रज्ञा शिरीष आपटे (साधिकेची मैत्रीण)
‘सौ. प्रज्ञा आपटे ही माझी मैत्रीण असल्याने मी तिला ‘सनातन संस्थे’च्या आकाशकंदिलाविषयी माहिती सांगितली, ‘‘साधक नामजप करत आकाशकंदिल सिद्ध करत असल्याने त्यात चैतन्य निर्माण होते. सनातनचा आकाशकंदिल घरात लावल्यावर त्यातील चैतन्यामुळे वास्तूभोवती संरक्षककवच निर्माण होऊ शकते. त्यामुळे आपल्या कुटुंबाला लाभ होतो आणि भोवतीच्या परिसरातही सकारात्मक परिणाम होतो.’’ हे सर्व ऐकल्यावर तिने आकाशकंदिलाची मागणी केली, तसेच ग्रंथ आणि अन्य सात्त्विक उत्पादनेही घेतली. त्या वेळी मी तिला कुलदेवता आणि ‘श्री गुरुदेव दत्त ।’ यांच्या नामजपाचे महत्त्व सांगितले. धर्मकार्याला अर्पण करण्याचे महत्त्व सांगितल्यावर तेथील सदनिकेतील अन्य काही जणींनीही अर्पण दिले.’ – सौ. नूतन शहा (वय ६३ वर्षे), सिंहगड रस्ता, पुणे.
१ आ. सनातनची उत्पादने नियमित वापरणारे आणि दिवाळीनिमित्त भेट म्हणून इतरांना ‘सनातन भेटसंच’ देणारे श्री. प्रशांत सरदेशमुख (वाचक) !
‘श्री. सरदेशमुख यांचा ‘सनातन संस्थे’च्या कार्यावर दृढ विश्वास आहे आणि साधकांविषयी त्यांच्या मनात आदरभावही आहे. ते सनातनची उत्पादने नियमित वापरतात. गेल्या ४ – ५ वर्षांपासून ते दिवाळीनिमित्त भेट म्हणून इतरांना ‘सनातन भेटसंच’ देतात. त्यांनी भेटसंच दिल्यानंतर काही जणांनी ‘आम्हाला चांगली भेट मिळाली’, अशी प्रतिक्रिया त्यांच्याजवळ व्यक्त केली. या वर्षीही त्यांनी ‘सनातन भेटसंचां’चे वाटप केले. प्रती वर्षीपेक्षा या वर्षी त्यांची भेटसंचांची मागणी अधिक होती. त्यांनी एका आस्थापनाला ‘सनातन भेटसंच’ दिला होता. त्या आस्थापनाच्या मालकांनीही त्यांच्या संपर्कातील काही जणांना भेट देण्यासाठी ‘सनातन भेटसंच’ विकत घेतले.
१ इ. ‘सनातन भेटसंचा’विषयी ऐकल्यावर तत्परतेने संचांची मागणी करणारे श्री. हितेश आकुल (धर्मप्रेमी) !
‘सनातन भेटसंचा’विषयी ऐकल्यावर श्री. हितेश आकुल यांनी तत्परतेने संचांची मागणी केली. त्यांनी ज्यांना ज्यांना भेटसंच दिले, त्या सर्वांनी त्यांना ‘भेटसंच’ आवडल्याचे सांगितले. त्यांच्या एका मित्रानेही भेटसंच घेतले. प्रतिवर्षी श्री. हरिश्चंद्र अण्णा दांगट ‘सनातन भेटसंच’ घेतात; पण या वर्षी त्यांना भेटसंच द्यायला जमणार नव्हते. त्यामुळे त्यांना शुभेच्छा पत्रांविषयी सांगितल्यावर त्यांनी ती तत्परतेने घेतली.
१ ई. मित्र आणि नातेवाईक यांना भेट म्हणून ‘सनातन भेटसंच’ देणारे श्री. संजय जगताप (वाचक) अन् सौ. देशमुख (जिज्ञासू) !
हे ३ – ४ वर्षांपासून नातेवाइकांना भेट देण्यासाठी म्हणून ‘सनातन भेटसंच’ घेत आहेत. श्री. संजय शिंदे हेही गेल्या ३ – ४ वर्षांपासून ‘सनातन भेटसंच’ घेऊन मित्र आणि नातेवाईक यांना भेट म्हणून देत आहेत. श्री. आनंद बिर्ला यांना ‘सनातन भेटसंच’ दाखवल्यावर त्यांनी तत्परतेने ‘सनातन भेटसंचा’ची मागणी दिली.’
– श्री. शशांक सोनवणे, सिंहगड रस्ता, पुणे.
२. भोसरी
२ अ. सनातनची सात्त्विक उत्पादने आणि लघुग्रंथ असलेले ४० भेटसंच घेणारे श्री. संदीप गावडे (हितचिंतक) !
‘यांनी वर्ष २०२२ च्या दिवाळीमध्ये ‘सनातन भेटसंच’ घेतले होते. या वर्षीही त्यांनी ४० भेटसंच घेतले. या भेटसंचां’मध्ये सनातनची सात्त्विक उत्पादने आणि लघुग्रंथ घालून त्यांना दिले. ही सेवा करतांना साधकांची पुष्कळ भावजागृती होत होती.
३. सातारा रस्ता
३ अ. गणेशमंडळे, तसेच मैत्रिणी आणि नातेवाईक यांना भेट म्हणून देण्यासाठी भेटसंच विकत घेणार्या सौ. स्वाती अभ्यंकर (वाचिका) : सौ. अभ्यंकर साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ घेतात. त्यांना भेटसंच दाखवल्यावर त्यांनी श्री गणेशमंडळांना देण्यासाठी भेटसंच घेतले. मैत्रिणी आणि नातेवाईक यांना दिवाळीनिमित्त भेट म्हणून देण्यासाठीही त्यांनी ‘सनातन भेटसंच’ घेतले.
३ आ. रक्षाबंधनाला भावाला भेट देण्यासाठी भेटसंच घेणार्या साधना सत्संगातील श्रीमती मोहिनी उणे (वाचिका)
साधना सत्संगातील वाचिका श्रीमती मोहिनी उणे यांनी ‘सनातन भेटसंच’ घेतले. त्या म्हणाल्या, ‘‘रक्षाबंधनाच्या वेळी हे भावाला भेट देता येईल !’’ संचामध्ये त्यांनी ‘देवीपूजन’ आणि ‘रांगोळी’ हे लघुग्रंथ ठेवण्यास सांगितले. ‘‘या ग्रंथांमुळे सर्वांना देवीच्या उपासनेचे शास्त्र कळेल’’, असेही त्या म्हणाल्या.
गुरुदेवांनी ‘सनातन भेटसंचा’चे वितरण करून घेतले आणि शिकण्याची संधी दिली’, यासाठी गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्रीमती माधवी गोरे (आध्यात्मिक पातळी ६८ वर्षे, वय ७२ वर्षे), सातारा रस्ता, पुणे.
४. पुणे गावठाण
४ अ. वितरणासाठी आकाशकंदिल घेणार्या सौ. अनुराधा रुईकर, पुणे शहर !
‘सौ. रुईकर यांनी काही आकाशकंदिल वितरणासाठी घेतले होते. ‘भिकारदास मारुति मंदिरा’जवळ लावलेल्या वितरण कक्षावर एका जिज्ञासूने आकाशकंदिल घेतला. त्यांना त्यावरील लिखाण आणि आकाशकंदिल पुष्कळ आवडला. काही वाचक आणि जिज्ञासू यांनीही आकाशकंदिल घेतले.
४ आ. आकाशकंदिलाचे महत्त्व सांगितल्यावर तो विकत घेणारे ‘अग्रीमा’ साडीचे दुकानमालक आणि तेथील कामगार !
पुणे येथे ‘अग्रीमा’ हे साडीचे दुकान आहे. त्यांना आकाशकंदिल दाखवून त्याचे महत्त्व सांगितल्यावर त्यांनी आकाशकंदिल घेतला. त्यांच्या दुकानात असलेल्या एका गोरक्षकाने आकाशकंदिल पाहिल्यावर त्यानेही आकाशकंदिलाची मागणी दिली.
(क्रमश:)
– संग्राहक : पू. (सौ.) मनीषा महेश पाठक, पुणे (२०.११.२०२३)