Moradabad Love Jihad : सरकारी ग्रंथपाल हसनकडून हिंदु विद्यार्थिंनींना मुसलमानांशी मैत्री करण्यास केले प्रवृत्त !

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) येथे ‘लव्ह जिहाद’चे षड्यंत्र रचण्याचा प्रयत्न !

मुरादाबाद (उत्तरप्रदेश) – येथे एका सरकारी कर्मचार्‍याने ‘लव्ह जिहाद’ला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. सरकारच्या शिक्षण विभागाच्या ग्रंथालयातील वरिष्ठ साहाय्यक आसिफ हसन याने हिंदु विद्यार्थिनींचे ‘ब्रेनवॉश’ केले. तो हिंदु विद्यार्थिनींना मुसलमान तरुणांशी बोलण्यासाठी प्रोत्साहित करायचा, तसेच इस्लामविषयी त्यांना माहिती सांगत असे. गेल्या सहा महिन्यांपासून हा प्रकार चालू होता ज्यांतर्गत बाहेरील मुसलमान तरुणही या ग्रंथालयाला भेट देत होते. (यातून हिंदु मुलींना ‘लव्ह जिहाद’च्या कचाट्यात अडकवण्याचे मुसलमानांचे पद्धतशीर प्रयत्न कशा प्रकारे चालतात, हेच स्पष्ट होते. – संपादक) काही विद्यार्थिनींनी जिल्हाधिकार्‍यांकडे याविषयी लेखी तक्रार केली. यानंतर आसिफ हसन याचे इतरत्र स्थानांतर करण्यात आलेे. (स्थानांतर केलेल्या ठिकाणीही हसन त्याची ही कृत्ये चालूच ठेवणार, हे प्रशासनाला लक्षात कसे येत नाही ? अशा घटनांवर आळा घालण्यासाठी त्याला निलंबित करून त्याचे सखोल अन्वेषण केले पाहिजे ! – संपादक)

सहशिक्षण संचालक मनोज कुमार द्विवेदी यांनी सांगितले की, या प्रकरणाच्या चौकशीसाठी दोन सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती आरोपांची चौकशी करणार असून पीडित विद्यार्थिनींशीही बोलणार आहे. दुसरीकडे हसनने हे आरोप निराधार असल्याचे म्हटले आहे.

संपादकीय भूमिका

मुसलमान जरी सरकारी कर्मचारी अथवा अधिकारी असले, तरी आधी ते मुसलमान असतात. त्यांची निष्ठा ही राष्ट्र आणि जनता यांच्याप्रती नाही, तर स्वबांधवांप्रतीच असते, हे सांगणारे उदाहरण !