मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने विधासभेच्या निवडणुकीसाठी त्यांच्या २२ उमेदवारांची दुसरी सूची घोषित केली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी २६ ऑक्टोबर या दिवशी पत्रकार परिषद घेऊन ही सूची घोषित केली.
यामध्ये धाराशिव जिल्ह्यातील परांडा विधानसभा मतदारसंघात शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाकडून राहुल पाटील यांनी उमेदवार घोषित केला आहे. याच मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडूनही माजी आमदार राहुल मोटे यांची उमेदवारी घोषित केली आहे. त्यामुळे या जागेवरून महाविकास आघाडीमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. याविषयी ‘उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून या मतदारसंघाचा प्रश्न सोडवू’, असे जयंत पाटील यांनी म्हटले.