‘११.५.२०२३ या दिवशी महर्षींच्या आज्ञेने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा ब्रह्मोत्सव साजरा करण्यात आला. त्याचे संगणकीय प्रक्षेपण पहातांना राजस्थान येथील साधकांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत. यातील काही सूत्रे आपण २३ ऑक्टोबर २०२४ या दिवशी पाहिली. आज उर्वरित भाग पाहूया.
या लेखाचा आधीचा भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/847141.html
४. श्री. एन्.एस्. पवार (वय ७५ वर्षे), जयपूर, राजस्थान.
४ अ. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाच्या दोन दिवस आधीपासूनच माझे मन पुष्कळ आनंदी होत होते. माझ्या मनात ‘ब्रह्मोत्सवात काय अनुभवायला येणार आहे ?’, असा विचार येत होता.
४ आ. ब्रह्मोत्सव पहातांना ‘हा उत्सव चालूच रहावा’, असे मला वाटत होते.’
५. सौ. शुभ्रा भार्गव, जयपूर, राजस्थान.
५ अ. ‘पडद्यावर ‘ब्रह्मोत्सव’ हा शब्द पाहून मला वाटले, ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कार्याचा संपूर्ण ब्रह्मांडात विस्तार होणार आहे आणि संपूर्ण विश्व गुरुमय होणार आहे. सूक्ष्मातून घडून गेलेल्या घटना आता स्थुलातून घडणार आहेत.’ हे अनुभवत असतांना माझे शरीर कंप पावत होते.’
६. कु. अनन्या मोदी (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय २२ वर्षे), जोधपूर, राजस्थान.
६ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना शरण जाऊन भावपूर्ण प्रार्थना केल्यावर पहिल्याच प्रयत्नात रांगोळी चांगल्या प्रकारे काढता येणे : ‘ज्या ठिकाणी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाचे संगणकीय प्रक्षेपण दाखवण्यात येणार होते, त्या ठिकाणी मला रांगोळी काढण्याची सेवा मिळाली होती. तेव्हा मला थोडा ताण आला; कारण या पूर्वी मी एकटीने कधीच रांगोळी काढली नव्हती. मला पुष्कळ प्रयत्न करूनही चांगली रांगोळी काढायला जमत नव्हते. मी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना शरण जाऊन भावपूर्ण प्रार्थना केली. तेव्हा मला पहिल्याच प्रयत्नात रांगोळी चांगल्या प्रकारे काढता आली. गुरुचरणी कृतज्ञता !’
७. सौ. राखी मोदी (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के, वय ४२ वर्षे), जोधपूर, राजस्थान.
७ अ. ‘हिंदु राष्ट्रात श्रीविष्णूच्या अवतारासमोर संत आणि धर्मवीर यांचा परिचय करून देण्यात येईल’, असे ब्रह्मोत्सवात काही साधकांचा परात्पर गुरुदेवांच्या समोर परिचय करून देत असतांना वाटणे : ‘या वर्षी गुरुदेवांचा दिव्य ब्रह्मोत्सव पहाण्याचे परम सौभाग्य मला प्राप्त झाले. ब्रह्मोत्सवात काही साधकांचा परात्पर गुरुदेवांच्या समोर परिचय करून देण्यात येत होता. तेव्हा मला वाटले, ‘भारतात १५ ऑगस्ट या दिवशी (स्वातंत्र्यदिनानिमित्त) विशेष कार्य करणार्या नागरिकांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार दिला जातो आणि त्यांचा सन्मान केला जातो, त्याचप्रमाणे ‘हिंदु राष्ट्रात साक्षात् विष्णूच्या अवतारासमोर संत आणि धर्म वीर यांचा परिचय करून देण्यात येईल.’
८. सौ. आशा राठी, जयपूर, राजस्थान.
८ अ. ‘ब्रह्मोत्सव’ हा शब्द पाहून परात्पर गुरु डॉ. आठवले ब्रह्मांडाचा उद्धार करणार आहेत’, असे वाटणे : ‘पडद्यावर ‘ब्रह्मोत्सव’ हा शब्द पाहून माझ्या मनात विचार आला, ‘हा अखिल ब्रह्मांडनायकाचा जन्मदिवस आहे आणि परात्पर गुरुदेव ब्रह्मांडाचा उद्धार करणार आहेत.’ त्यानंतर माझा भाव जागृत झाला.
८ आ. सनातनचे तिन्ही गुरु (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ) रथातून आल्यावर मला वाटले, ‘महाभारतातील युद्धाच्या वेळी श्रीकृष्णाने रथ आणला होता, तसाच हा रथ आहे.’ (समाप्त)
(लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : २०.५.२०२३)
|