अन्य दोन प्रकरणांमुळे मात्र कारागृहातून सुटका नाही
मुंबई – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संबंधित १०० कोटी रुपयांच्या कथित वसुली प्रकरणात गेल्या दोन वर्षांपासून कारागृहात असलेले बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना जामीन संमत करण्यात आला. देशमुख यांच्यासह अन्य आरोपी जामिनावर असल्यामुळे वाझे यांनीही जामिनासाठी याचिका केली होती. त्यानंतर त्यांना जामीन संमत करण्यात आला. त्यांना या प्रकरणात जरी जामीन मिळाला असला, तरी मनसुख हिरेन हत्याकांड आणि अँटिलिया स्फोटक या प्रकरणांत त्यांना अद्याप कारागृहातच रहावे लागणार आहे.