सोलापूर – गोवा मुक्तीसंग्रामात विलक्षण कार्य करणार्या क्रांतीवीर वसंतदादा बडवे यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा यंदाचा ‘हिंदुत्व शौर्य पुरस्कार’ हिंदुत्वनिष्ठ श्री. संजय साळुंखे यांना प्रदान करण्यात आला. ते गेल्या अनेक वर्षांपासून ‘लव्ह जिहाद’ विरुद्ध व्यापक कार्य करत आहेत. पंढरपूर येथील ‘सद्गुरु गुंडा महाराज संस्थान’चे मठाधिपती ह.भ.प. चक्रीनाथ महाराज सिद्धरस यांच्या शुभहस्ते, तर ह.भ.प. लक्ष्मण महाराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी ‘क्रांतीवीर बडवे न्यास’चे अध्यक्ष श्री. अभयसिंह इचगावकर आणि मान्यवर उपस्थित होते.
रुक्मिणी पटांगण येथे क्रांतीवीर वसंतदादा बडवे यांच्या पुतळ्यासमोर झालेल्या कार्यक्रमाचा प्रारंभ स्वातंत्र्यवीरांच्या अखिल हिंदु विजय ध्वजगीताने झाला. या कार्यक्रमास सोलापूर हिंदु महासभा अध्यक्ष श्री. सुधाकर बहिरवाडे, हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते सर्वश्री संजयकाका होमकर, मोहनराव मंगळवेढेकर, आनंद उत्पात इत्यादी मान्यवर उपस्थित होते. पंढरपूर हिंदु महासभेचे अध्यक्ष विकास मोरे यांनी आभार प्रदर्शन केले आणि तुकाराम चिंचणीकर यांनी ‘पसायदान’ म्हणून कार्यक्रमाची सांगता केली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वश्री प्रशांत खंडागळे, दीपक कुलकर्णी, ओंकार वाटाणे, विठ्ठल बडवे, अनिकेत बडवे, पंडित भोले पुणेकर आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
‘लव्ह जिहाद’ रोखण्यासाठी हिंदु समाजाला धर्मशिक्षणाची आवश्यकता ! – संजय साळुंखे
धर्मांध सुनियोजित पद्धतीने आपल्या आया-बहिणींना लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवत आहेत. हे आक्रमण रोखण्यासाठी हिंदु समाजाने जागरूक रहाणे, तसेच मुला-मुलींना धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सोलापूरचे हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते श्री. संजय साळुंखे यांनी केले. ‘हिंदुत्व शौर्य’ पुरस्कार स्वीकारतांना त्यांनी मनोगत व्यक्त केले.