|
नवी देहली – वक्फ सुधारणा विधेयकावर चर्चा करण्यासाठी येथील संसद भवनात २२ ऑक्टोबर या दिवशी झालेल्या संयुक्त संसदीय समितीच्या बैठकीत गदारोळ झाला. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांमध्ये जोरदार वादावादी झाली. भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांचे खासदार एकमेकांना भिडले.
Correction : Kalyan Banerjee suspended from JPC
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) October 22, 2024
यावेळी तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी आधी टेबलावर पाण्याची काचेची बाटली फोडली आणि नंतर ती समितीचे अध्यक्ष जगदंबिका पाल यांच्या दिशेने फेकली. या घटनेत कल्याण बॅनर्जी स्वत: घायाळ झाले. त्यांच्या बोटांना ४ टाके पडले. या घटनेनंतर बॅनर्जी बैठक सोडून निघून गेले. या घटनेनंतर कल्याण बॅनर्जी यांना समितीतून निलंबित करण्यात आले.
या बैठकीत ओडिशातील एका संघटनेचे सदस्य त्यांचे मत मांडत होते. या वेळी कोलकाता उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आणि सध्याचे भाजपचे खासदार अभिजित गंगोपाध्याय अन् तृणमूल काँग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यात बाचाबाची झाली. त्यानंतर ही घटना झाली.
का झाला वाद ?
बैठकीत सर्वसामान्यांना बोलावून या विधेयकावर त्यांचे मत का घेण्यात येत आहे ?, असा प्रश्न विरोधी पक्षांच्या सदस्यांनी उपस्थित केला. यावर भाजपच्या एका सदस्याने सांगितले, ‘समितीच्या अध्यक्षांना त्यांच्या विवेकबुद्धीनुसार ज्याला योग्य वाटेल, त्याला बोलावून विधेयकावर सूचना मागवण्याचा अधिकार आहे.’ यावर कल्याण बॅनर्जी यांच्यासह अनेक जण संतप्त झाले आणि त्यानंतर बॅनर्जी यांनी वरील कृत्य केले.
संपादकीय भूमिका
|