|
मुंबई – ‘टीम इंडिया’ची खेळाडू आणि टी – २० विश्वचषकामध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेली भारतीय महिला संघाच्या मधल्या फळीतील प्रमुख खेळाडू जेमिमा रॉड्रीग्ज हिचे ३ वर्षांचे मानद सदस्यत्व ‘खार जिमखाना क्लब’ने रहित केले. हा क्लब मुंबईतील सर्वांत जुन्या क्लबपैकी एक आहे. जेमिमाच्या वडिलांनी तिला मिळालेल्या सदस्यत्वाचा वापर ‘धार्मिक कृत्या’साठी केल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे जिमखान्याकडून सांगण्यात आले. (या प्रकरणी जेमिमाच्या वडिलांनाही कठोर शिक्षा व्हायला हवी ! – संपादक)
खार जिमखान्याच्या अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जेमिमाचे वडील क्लब परिसराचा वापर धार्मिक कार्यासाठी करत होते. काही सदस्यांनी यावर आक्षेप घेतला. या कार्यक्रमात धर्मांतर केले गेल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला. त्यामुळे सदस्यत्व रहित करण्याची कारवाई केली गेली. याला सर्वसाधारण सभेत उपस्थित असलेल्या सदस्यांनीही संमती दिली.
खार जिमखाना व्यवस्थापकीय समितीचे सदस्य शिव मल्होत्रा म्हणाले, ‘‘जेमिमाचे वडील ‘ब्रदर मॅन्युअल मिनिस्ट्रिज’ या संस्थेशी संलग्न होते. त्यांनी जवळपास दीड वर्षासाठी खार जिमखान्याच्या सभागृहाचा वापर करत होते. तेथे ३५ कार्यक्रम आयोजित केले. तेथे त्यांच्याकडून धर्मांतर करण्याचे प्रकार चालू होते. खार जिमखाना कोणत्याही धार्मिक कार्यक्रमाला अनुमती देत नाही.’’
संपादकीय भूमिकायावरून ‘ख्रिस्ती हिंदूंच्या धर्मांतराचे एकही संधी सोडत नाही’, हेच दिसून येते. अशांपासून हिंदूंनी सावध रहायला हवे ! |