भाजपचे खासदार प्रदीप सिंह यांचे हिंदूंना आवाहन
अररिया (बिहार) – स्वतःला हिंदु म्हणायला लाज कशाची ? आम्ही म्हणतो की, जर तुम्हाला अररियात रहायचे असेल, तर तुम्हाला हिंदु व्हावे लागेल आणि हिदु म्हणून वागावे लागेल. जेव्हा तुम्हाला तुमच्या मुलाचे किंवा मुलीचे लग्न करायचे असेल, तेव्हा जात शोधा; परंतु जेव्हा हिंदूंच्या ऐक्याचा प्रश्न येतो, तेव्हा मात्र आधी हिंदु बना आणि मग जात शोधा, असे विधान भाजपचे खासदार प्रदीप कुमार सिंह यांनी येथे एका कार्यक्रमात केले. या संदर्भातील एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांत प्रसारित झाला आहे.
या विधानावर सामाजिक माध्यमांत टीका करण्यात आली. भाजपशी संबंधित लोकांचे म्हणणे आहे की, हे विधान दोन धर्मांसाठी नसून वेगवेगळ्या मार्गांनी विभागलेल्या हिंदूंना एकत्र आणण्यासाठी आहे, तर दुसरीकडे विरोधी पक्षांच्या लोकांनी हा भाजपचा समाजातील बंधुभाव संपवण्याचा डाव असल्याचा आरोप केला आहे.