Bihar Temple Idols Vandalized : भागलपूर (बिहार) येथे मंदिरांतील मूर्तींची तोडफोड

  • मूर्तींवरील दागिन्यांचीही चोरी !

  • संतप्त लोकांकडून पोलिसांवर दगडफेक

  • पोलिसांकडून लाठीमार आणि हवेत गोळीबार

मंदिरांतील मूर्तींच्या तोडफोडीच्या विरोधात जमलेले हिंदू

भागलपूर (बिहार) – येथे संहौला भागात असणार्‍या एका मंदिरात अज्ञातांकडून १९ ऑक्टोबरच्या रात्री श्री दुर्गादेवी, श्रीराम, सीता, राधा आणि श्रीकृष्ण यांच्या मूर्तींची तोडफोड करण्यात आली. मूर्तींचे दागिने चोरून नेण्यात आले. या घटनेमुळे संतप्त झालेल्या जमावाने दगडफेक केल्याने येथे तणावाची स्थिती निर्माण झाली. येथे पोचलेल्या पोलिसांनी प्रथम लाठीमार केला आणि नंतर हवेत गोळीबार केला. लोकांनी येथील पोलीस ठाण्याला घेरावही घातला. ‘पोलीस ठाण्याच्या मागे असलेल्या मंदिरात असा प्रकार कसा घडला ?’, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

सकाळी या घटनेची माहिती मिळाल्यानंतर संतप्त लोकांनी घोघा-सनहौला मुख्य रस्ता अडवून धरला होता. पोलिसांनी लाठीमार केल्यामुळे त्यांच्यावर दगडफेक करण्यात आली. पोलीस लोकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

  • बिहारमध्ये भाजप आणि जनता दल (संयुक्त) पक्ष यांचे सरकार असतांना अशी घटना होऊ नये, असेच हिंदूंना वाटते !
  • देशात कोणत्याही पक्षाचे सरकार असतांना हिंदूंच्या मंदिरांवर आक्रमणे होत आहेत, हे देशात हिंदु असुरक्षित आहेत, हेच दर्शवतात !

पोलिसांनी एका आरोपीला पकडून त्याला ‘वेडा’ घोषित केले !

पोलिसांनी या तोडफोडीच्या प्रकरणी एकाला अटक केली आहे. या संदर्भात पोलिसांनी प्रसिद्धीपत्रक प्रसारित करून अटक केलेला आरोपी ‘वेडा’ असल्याचे म्हटले आहे. ‘सामाजिक माध्यमांवरून दिशाभूल करणार्‍या बातम्या आणि अफवा पसरवू नका’, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

संपादकीय भूमिका

  • अशा प्रकारच्या दाव्याद्वारे बिहार पोलीस जनतेला ‘वेडे’ समजते असे त्यांना वाटते का ?
  • अशा प्रकारच्या वेड्यांना हिंदूंच्या मंदिरांतील देवतांच्या मूर्तींची तोडफोड करण्याची आणि मूर्तींवरील दागिने चोरण्याची बुद्धी कशी होते, हे बिहार पोलिसांनी सांगितले पाहिजे !