देहाने प्रपंच केला; पण तो फळाला येत नाही; म्हणून संतांनी नामस्मरणाचा मार्ग सांगितला; पण आमचे शहाणपण आणि आमचा अभिमान हा नाम घेण्याच्या आड येतो, त्याला काय करावे ? हा अभिमान दुसरा कुणी उत्पन्न करतो, असे थोडीच आहे ? आपल्या लक्षातही येत नाही. इतके सूक्ष्म असे वासनेचे बीज आपल्यात कुठेतरी दडलेले असते. त्यामुळे लौकिकाची अभिलाषा सुटत नाही. याकरता संतांनी एक मार्ग सुचवला आहे आणि तो म्हणजे नामस्मरणात राहून विषयाची उर्मी उठू न देणे !
– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज