‘राम कर्ता म्हणेल तो सुखी’, ‘मी कर्ता म्हणेल तो दुःखी’. लहान मुलाप्रमाणे निरभिमान असावे. कोणत्याही चांगल्या-वाईट कर्माचा अभिमान धरू नका किंवा खेदही करू नका. गर्व झालाच, तर रामाची आठवण करा, तो तुमचा अभिमान नष्ट करील. लाभाच्या वेळी अभिमान उत्पन्न होतो, तोट्याच्या वेळी दैव आठवते; म्हणून दोन्ही प्रसंगी अभिमान नसावा. माझे कर्तेपण मेल्याखेरीज भगवंत प्रसन्न होणार नाही. प्रत्येक कर्माचे वेळी त्याचे स्मरण करूया. रामालाच सर्व समर्पण करू आणि समाधान मानून घेऊ.
– ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज