पू. ह.भ.प. धोंडिराम कृष्णा रक्ताडे महाराज यांनी १६ सहस्रांपेक्षा अधिक अभंगांची निर्मिती केली असून हे सर्व अभंग त्यांना स्फुरलेले आहेत. या अभंगांचे वैशिष्ट्य, म्हणजे हे अभंग सर्वसामान्य मनुष्याला समजतील असे साधे, सोपे आणि भक्तीचा अविट गोडवा असलेले आहेत. त्यातील काही अभंग प्रसिद्ध करत आहोत.
संपला तो अज्ञातवास । साधावे देव कार्यास ।। १ ।।
साहाय्याला येतील देव । निर्विघ्न घडेल सर्व ।। २ ।।
जनसेवा सर्वश्रेष्ठ । सेवक होईल मुक्त ।। ३ ।।
परांना (इतरांना) संतुष्ट करतील । ते ईश्वर कार्य साधतील ।। ४ ।।
– ह.भ.प. धोंडिबा रक्ताडे (महाराज), वाळवे-बद्रुक, जिल्हा कोल्हापूर. (साभार : ग्रंथ ‘धोंडिबाची अभंगवाणी’, खंड – १)