रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात झालेल्या ‘देवी होमा’च्या वेळी साधिकेला आलेल्या अनुभूती

‘२७.९.२०२२ या दिवशी रानमाथी गोवा, येथील सनातनच्या आश्रमात नवरात्रीच्या निमित्ताने ‘देवी होम’ केला. त्या वेळी साधकांना ‘ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे ।’ हा मंत्र म्हणायला सांगितला होता. हा मंत्र म्हणत असतांना सुश्री (कु.) प्रतीक्षा हडकर यांना आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.

कु. प्रतीक्षा हडकर

१. त्रासदायक अनुभूती

अ. ‘ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डायै विच्चे ।’ हा मंत्र म्हणतांना मला शक्ती जाणवत होती आणि दम लागत होता.

आ. सायंकाळनंतर माझी अंगदुखी वाढली. मला थकवा येऊन पाय पुष्कळ दुखत होते.

इ. यागाला आरंभ केल्यापासून ते याग संपेपर्यंत मला गळून गेल्यासारखे झाले होते. माझ्या अंगात शक्ती नसल्यासारखे झाले होते.

ई. श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यागाच्या ठिकाणी आल्यावर मला होणार्‍या शारीरिक त्रासाचे प्रमाण थोडे अल्प झाले.

२. चांगल्या अनुभूती

२ अ. यागाच्या दिवशी आश्रमात वावरत असतांना ‘मी भूमीवर उभी नसून हवेत तरंगत आहे’, असे मला जाणवत होते.

२ आ. महर्षींनी सांगितल्यानुसार मी पांढरा पोषाख परिधान केला होता. तेव्हा मला चांगले वाटून ‘देवी मला वेगळ्याच विश्वात नेत आहे’, असे मला वाटले.

२ इ. सौ. सायली करंदीकर ‘जय शारदे वागेश्वरी’ हे गीत गात असतांना सभोवताली श्री सरस्वतीदेवीचे अस्तित्व जाणवणे : सौ. सायली करंदीकर हिने ‘जय शारदे वागेश्वरी’, हे गीत गायला आरंभ केल्यापासून ते संपेपर्यंत मला सभोवताली श्री सरस्वतीदेवीचे अस्तित्व जाणवून अधिक चांगले वाटू लागले. तेव्हा मला कुलदेवीचे (श्री कालिकामातेचे) स्मरण झाले. त्यानंतर मी आपोआप देवीला ‘आई, ये गं. धावत ये गं’, अशा आतून हाका मारू लागले. तेव्हा माझी भावजागृती झाली आणि ‘हे गीत संपूच नये’, असे मला वाटत होते.

२ ई. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांना पाहून आलेल्या अनुभूती  

१. श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांना पाहिल्यावर मला भावाश्रू येत होते.

२. माझ्या आज्ञाचक्रावर गारवा जाणवत होता.

३. त्यांना पाहून माझ्या अंगावर रोमांच आले.

४. नंतर वातावरणात गारवा आणि उत्साह जाणवला.

२ उ. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांची मानस आरती करतांना भावाश्रू येणे : श्री बगलामुखीदेवीची आरती चालू असतांना मी डोळे मिटून श्रीसत्‌शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांची मानस आरती करत होते. त्या वेळी माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येत होते.’

– सुश्री (कु.) प्रतीक्षा हडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२८.९.२०२२)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक