१. ‘२१.१.२०२२ या दिवशी धन्वन्तरि यागाच्या वेळी मला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे दर्शन झाले. त्यांनी परिधान केलेल्या रंगीत साड्यांमुळे माझे मन प्रफुल्लित झाले.
२. ‘श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्याकडून माझ्याकडे चैतन्याचा स्रोत येत आहे’, असे मला जाणवले.
३. यज्ञाचा संकल्प केला गेला, तेव्हा मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे धन्वन्तरि देवतेच्या रूपामध्ये दर्शन झाले.
४. परात्पर गुरु डॉ. आठवले ‘माझ्यासाठी नामजपादी उपाय करत आहेत’, असे मला जाणवले. त्यामुळे मला आलेला जडपणा जाऊन हलके वाटायला लागले. माझा कृतज्ञताभाव दाटून आला आणि माझी भावजागृती झाली.
५. यज्ञाच्या दुसर्या सत्रात मला चंदनाचा सुगंध आला आणि तोंडामध्ये गोड चव आली.
६. यज्ञाच्या तिसर्या सत्रात मला यज्ञातील लाल ज्वाळा दिसत होत्या. नंतर मला त्यांचा रंग पिवळसर दिसू लागला. त्या वेळी मला पुष्कळ चैतन्य जाणवत होते. शेवटच्या १०८ समिधांची आहुती दिल्यावर मला पांढर्या रंगाच्या ज्वाळा दिसू लागल्या. त्यामुळे माझे मन शांत झाले.
प.पू. गुरुदेवांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. अंजना निवृत्ती चव्हाण (वर्ष २०२४ मधील आध्यात्मिक पातळी ६६ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२१.१.२०२२)
|