१. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी साधिकेवरील आवरण काढण्यास प्रारंभ केल्यावर तिच्या चेहर्यात पालट होणे
‘१२.८.२०२४ या दिवशी मला ‘स्लीप डिक्स’च्या (टीप) आजारामुळे पुष्कळ शारीरिक त्रास होत होता. दोन दिवस मी औषध घेतले; परंतु त्यात काही पालट जाणवला नाही. खोलीतील सहसाधिकेने सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना भ्रमणभाष करून मला होणार्या शारीरिक त्रासाच्या संदर्भातील सर्व माहिती सांगितली. त्यावर सद्गुरु गाडगीळकाकांनी जवळ जवळ ३० ते ४० मिनिटे माझ्यावरील आवरण काढले. सद्गुरु काकांनी आवरण काढण्यास प्रारंभ केल्यावर हळूहळू माझ्या चेहर्यात पालट होत होता. तेव्हा सहसाधिकेप्रती माझी कृतज्ञता व्यक्त झाली. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले नेहमी आवरण काढण्याचे महत्त्व सांगतात. ते या प्रसंगातून माझ्या लक्षात आले.
टीप : ‘स्लीप डिक्स’ या व्याधीमध्ये पाठीच्या दोन मणक्यांच्या मध्ये असणारी चकती अथवा चकतीचा भाग सरकल्यामुळे जवळच्या नसांवर ताण येऊन त्यामुळे वेदना होतात.
२. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी आवरण काढल्यावर लगेच उठून बसता येणे आणि १ घंटा नामजप केल्यावर वेदना न्यून होऊन चालताही येणे
सद्गुरु काकांनी आवरण काढल्यावर मला ‘स्लीप डिक्स’चा ‘श्री दुर्गादैव्ये नमः । ॐ नमो भगवते वासुदेवाय । श्री हनुमते नमः । ॐ नमः शिवाय । ॐ नमः शिवाय ।’ हा नामजप करायला सांगितला. सद्गुरु काकांनी आवरण काढल्यावर मी लगेच उठून बसले. नंतर मी १ घंटा नामजप केल्यानंतर माझ्या वेदना न्यून झाल्या आणि मला चालताही येऊ लागले.
३. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्याशी काही क्षण बोलल्यावरही बरे वाटणे आणि ‘त्यांच्यासारखी ऋषितुल्य व्यक्ती सनातन संस्थेत आहे, हे सर्व साधकांचे भाग्यच असणे’, असे वाटणे
सद्गुरु गाडगीळकाका यांच्याशी काही क्षण बोलले, तरी मला पुष्कळ बरे वाटते. मला असा अनुभव बर्याच वेळा आला आहे. त्यांच्याकडे बघून मला पूर्वीचे ऋषिमुनीच आठवतात. खरंच सद्गुरुकाका, म्हणजे पूर्वीचे ऋषीच आहेत. असे मलाच नाही, तर सर्व साधकांना जाणवते. अशी ऋषितुल्य व्यक्ती सनातन संस्थेत आहे, हे सर्व साधकांचे भाग्यच आहे.
‘प.पू. गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) आणि सद्गुरु cकाका यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता!’
– गुरुदेवांच्या चरणांची धूळ,
सौ. अनुपमा जोशी (आध्यात्मिक पातळी ६४ टक्के, वय ७१ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१६.८.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |