Pakistan On Kargil War : कारगिलचे युद्ध पाकच्‍या सैनिकांनीच केले !

युद्धाच्‍या २५ वर्षांनंतर पाकिस्‍तानचे सैन्‍यदलप्रमुख असीम मुनीर यांची स्‍वीकृती

पाकिस्‍तानचे सैन्‍यदलप्रमुख असीम मुनीर

इस्‍लामाबाद (पाकिस्‍तान) – कारगिल युद्धात पाकिस्‍तानी सैन्‍याचा सहभाग होता, अशी स्‍वीकृती पाकिस्‍तानच्‍या सैन्‍याचे प्रमुख असीम मुनीर यांनी २५ वर्षांनंतर पहिल्‍यांदाच दिली आहे. यापूर्वी हे युद्ध पाक सैन्‍याने नाही, तर जिहादी आतंकवाद्यांनी केले होते, असे पाकचा दावा होता.  या युद्धामध्‍ये ५२७ भारतीय सैनिकांना वीरमरण आले, तर पाकच्‍या  ४५० सैनिकांना ठार करण्‍यात आले होते.

मुनीर म्‍हणाले की, पाकिस्‍तानात शूरवीर सैनिकांचा एक समूह आहे, जो पाकिस्‍तानसाठी काहीही करायला सिद्ध आहे. वर्ष १९४८, १९६५, १९७१ युद्ध असो किंवा वर्ष १९९९ चे कारगिल युद्ध असो, देशातील सहस्रो सैनिकांनी देश आणि इस्‍लाम यांसाठी बलिदान दिले आहे.

संपादकीय भूमिका

पाकने मान्‍य केल्‍यानंतरही भारत पाकच्‍या विरोधात काही पावले उचलणार आहे का ? कारण ही गोष्‍ट भारताच्‍या दृष्‍टीने जाहीरच होती ! भारत याचा सूड कधी घेणार आहे का ? पाकमध्‍ये घुसून पाकला नष्‍ट करणार आहे का ?