आंबेडकरनगर (उत्तरप्रदेश) – येथे पोलिसांनी गोमांसाच्या प्रकरणी २ दुचाकींवरून जाणार्या ४ जणांना अडवल्यावर त्यांनी पोलिसांवर गोळीबार केला. पोलिसांनी यातील दिलशाद बेग आणि अरबाज या २ जणांना अटक केली असून त्यांच्याकडून ३२ किलो गोमांस जप्त केले आहे. तसेच एक बंदूक, काडतुसे, धारदार शस्त्र, १ दुचाकी आणि भ्रमणभाष संच हेही जप्त करण्यात आले. सलमान आणि गुडनू हे पसार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.
दिलशाद आणि अरबाज यांनी चौकशीत सांगितले की, ते पैसे कमवण्यासाठी गायींची हत्या करून गोमांस विकायचे. (देशात अल्पसंख्य असणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य असतात ! अशी लोक शिक्षण घेऊन मोठे झाली, तरी त्यांच्या वृत्तीत पालट होत नाही, असेही अनेक घटनांतून दिसून आले आहे ! – संपादक)
संपादकीय भूमिकागोमांसाची तस्करी करणारे पोलिसांवर गोळीबार करण्याचे धाडस करतात, यावरून ते तस्कर नसून आतंकवादी आहेत आणि आतंकवाद्यांवर जशी कारवाई केली जाते, तशीच त्यांच्यावर करणे आवश्यक आहे ! |