चंदननगर (पुणे) येथे हातपाय नसलेला मृतदेह सापडल्याचे प्रकरण !
पुणे – चंदननगरमधील नदीपात्रामध्ये डोके, हातपाय नसलेला मृतदेह आढळून आला होता. या महिलेच्या हत्येचा उलघडा करण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. सकिना खान असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तिचा सख्खा भाऊ अशपाक खान आणि वहिनी हमिदा खान या दोघांनी मिळून तिची हत्या केल्याचे उघड झाले आहे. पाटील इस्टेटमधील एका खोलीवरून भाऊ आणि बहिणीमध्ये वाद चालू होता. या वादातून हत्या केल्याचे निष्पन्न झाले आहे. (संपत्तीसाठी स्वतःच्या बहिणीचाही खून करण्यास मागे पुढे न पहाणार्या धर्मांधांची विकृत मनोवृत्ती जाणा ! – संपादक)
सकीना घरी दिसत नसल्याने शेजार्यांच्या लक्षात आले. त्यांनी तिची विचारपूस केली असता अशपाकने ती गावाला गेली आहे, असे सांगितले. शेजार्याला संशय आल्याने त्याने शिवाजीनगर पोलिसांना माहिती दिली. त्यावरून गुन्ह्याची उकल करण्यात आली.