१११ टन कचर्याचे संकलन !
पुणे – डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे प्रमुख पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी आणि डॉ. सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्वच्छता मोहीम आयोजित करण्यात आली. १५ वर्षांपासून साठलेल्या १११.५ टन कचर्याचे संकलन करण्यात आले. या स्वच्छता मोहिमेमध्ये पुणे शहरातून प्रतिष्ठानचे १ सहस्र ६८५ सदस्य सहभागी झाले होते. या वेळी आमदार भीमराव तापकीर यांच्यासह विविध पदाधिकारी उपस्थित होते.
स्वच्छता मोहिमेमध्ये ओला कचरा ३१ टन, तर सुका कचरा ८०.५ टन संकलित करण्यात आला, तसेच तळजाई टेकडी वन विभागाच्या कडेला असलेली वस्ती, सोसायटी बाजूच्या परिसरातील ३३९०४३ स्क्वेअर मीटर तळजाई टेकडीचा परिसर स्वच्छ करण्यात केला. स्वच्छता नसल्याने आणि झाडांची देखभाल होत नसल्याने याठिकाणी वारंवार आगीच्या घटना घडत आहे. (वन विभागाच्या अंतर्गत टेकडीच्या कडेला असलेल्या परिसरात एवढा कचरा असतांना प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष का ? – संपादक)
संपादकीय भूमिका
|