फैजपूर (जिल्हा जळगाव) येथील अवैध पशूवधगृह पोलिसांनी पाडले !

  • ३ धर्मांधांना अटक

  • २२० किलो गोवंशियांचे मांस, तर २३ किलो वजनाचे बैलाचे कातडे जप्त

प्रतिकात्मक छायाचित्र

जळगाव – फैजपूर येथील अवैध पशूवधगृह पोलिसांनी पाडले. शेख नईम उपाख्य नम्मा अब्दुल रहिम कुरेशी यांच्या घराच्या शेजारी पत्र्याच्या शेडमध्ये अवैध पशूवधगृह चालू असल्याचे माहिती मिळाल्यावर पोलिसांनी तेथे घाड घातली. या वेळी तेथे ईकराम शेख नईम कुरेशी, वसीम शेख अब्दुल रहीम कुरेशी आणि शेख मुस्तकीम शेख कलीम यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून २२० किलो गोवंशियांचे मांस, तसेच २३ किलो वजनाचे बैलाचे कातडे इत्यादी जप्त करण्यात आले.

संपादकीय भूमिका

अशा पद्धतीची कारवाई संपूर्ण राज्यभरात झाल्यास गोवंशियांच्या हत्या होण्याला आळा बसेल !