Mandir Theft : आसाममधून आलेल्‍या मुसलमान चोरांकडून मंदिरात घुसून चोरी !

 मडिकेरी (कर्नाटक) येथील घटना

मडिकेरी (कर्नाटक) – येथील कोटे मारियम्‍मा मंदिराचे दार तोडून चोरट्यांनी दानपेटी फोडून २ लाख ५० सहस्र रुपये रोख रक्‍कम आणि दागिने यांची चोरी केली. पोलिसांनी सीसीटीव्‍ही चित्रणाच्‍या आधारे आरोपींना शोधून काढले. अल्‍ताब अली आणि मीर हुसेन अशी त्‍यांची नावे असून ते मूळचे आसाममधील आहेत. त्‍यांच्‍याकडून ३ ग्रॅम सोने, १६० ग्रॅम चांदी आणि ९५ सहस्र रुपये जप्‍त करण्‍यात आले आहेत.

अल्‍ताब येथे कामगार म्‍हणून काम करत होता, तर मीर हुसेन चोरी करण्‍यासाठीच आसाममधून येथे आला होता. पोलीस अधीक्षक रामराजन् यांनी ‘आसाममधून येणार्‍या कामगारांची माहिती पोलिसांना न देता अशा प्रकारच्‍या गुन्‍हेगारी कृत्‍यांमध्‍ये कामगार अडकले, तर त्‍यांना काम देणार्‍यांच्‍या विरोधात गुन्‍हा नोंदवला जाईल’, अशी चेतावणी दिली आहे.

संपादकीय भूमिका

महंमद गझनीचे वंशज या देशात अद्याप आहेत, हे लक्षात घ्‍या ! कर्नाटकात काँग्रेसचे सरकार आल्‍यापासून धर्मांधांना हिंदूंच्‍या विरोधात कृत्‍य करण्‍यास मोकळीक मिळाली आहे, हेच यातून पुन्‍हा दिसून येते !