जिहादी विचारसरणीतून आक्रमण झाल्याचा संशय !
बर्लिन (जर्मनी) – जर्मनीतील सोलिंगेन येथे २३ ऑगस्टच्या रात्री एका कार्यक्रमाच्या वेळी चाकूद्वारे करण्यात आलेल्या आक्रमणात ३ जण ठार, तर ९ जण घायाळ झाले. लोकांच्या मानेवर चाकूने वार करण्यात आल्याने घायाळांपैकी ४ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. आक्रमण केल्यानंतर आरोपी पळून गेला. सोलिंगेन शहराच्या स्थापनेला ६५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी १० सहस्र लोक सहभागी झाले होते. आक्रमण करणारा कोण होता, हे अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी जिहादी विचारसरणीतून हे आक्रमण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
संपादकीय भूमिकासंपूर्ण युरोप जिहादी आतंकवादाच्या सावटाखाली वावरत आहे, याचे उदाहरण ! |