‘भारताच्या १८ व्या लोकसभेत देशभरातून ५४३ खासदार नव्याने निवडून आले आहेत. ‘निवडणूक विश्लेषण संस्थे’ने ५४३ खासदारांपैकी २५१ खासदारांवर, म्हणजे सुमारे ४६ टक्के खासदारांवर फौजदारी गुन्हे नोंद असल्याचे सांगितले.’ (२५.६.२०२४)
भारताच्या इतिहासात केवळ चारच लोकांना ‘पुण्यश्लोक’ ही उपाधी देण्यात आली आहे. त्यामध्ये सर्वप्रथम भगवान श्रीविष्णु, त्यानंतर राजा नल, राजा युधिष्ठिर आणि कलियुगामध्ये अहिल्याबाई होळकर यांनाच ही उपाधी देण्यात आली आहे. ज्यांचे चरित्र निष्कलंक होते, अशा व्यक्तींना ‘पुण्यश्लोक’ म्हटले गेले आहे ! – श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे १३ वे वंशज