मुंबई – वर्ष २०१९ मध्ये गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी केलेल्या स्फोटाच्या प्रकरणातील आरोपी सत्यनारायण राणी याला दोषमुक्त करण्यासाठी केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. याचिका फेटाळतांना या आक्रमणात सत्यनारायण राणी आणि त्याचे सहकारी यांचा सकृतदर्शनी सहभाग स्पष्ट होत असल्याचे निरीक्षण न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे यांच्या खंडपिठाने या वेळी नोंदवले.
यापूर्वी विशेष न्यायालयाने सत्यनारायण राणी आणि त्याचे सहकारी यांना दोषमुक्त करण्याची याचिका फेटाळून लावली होती. विशेष न्यायालयाच्या या निर्णयाच्या विरोधात सत्यनारायण राणी याने मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले; मात्र मुंबई उच्च न्यायालयाने राणी आणि त्याचे सहकारी यांचा गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट होत असल्याचे नमूद करत विशेष न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवला आहे.
संपादकीय भूमिका :नक्षलवाद्यांना दोषमुक्त करण्यासाठी याचिका प्रविष्ट होणे दुर्दैवी ! |