काबुल – अफगाणिस्तानमध्ये तालिबान सरकारने काढलेल्या आदेशानुसार सरकारी कर्मचार्यांना दिवसातून ५ वेळा नमाजपठण करावे लागणार आहे. ‘असे न केल्यास शिक्षेसाठी सिद्ध रहा’, असे तालिबानचा सर्वोच्च नेता हिबतुल्ला अखुंदजादा याने म्हटले आहे.
१. वर्ष २०२१ मध्ये तालिबानने सत्ता कह्यात घेतल्यापासून अखुंदजादा याने अफगाणी लोकांवर मोठ्या प्रमाणावर निर्बंध लादले आहेत. यामध्ये महिला आणि मुली यांच्या शिक्षणावर आणि संगीत यांवर बंदी घालणे यांचा समावेश आहे.
२. तालिबान सरकारची मंत्रालये आणि संस्थांमधील अधिकारी हे नियोजित वेळी नमाजपठण करण्यास शरीयतने बांधील आहेत.
३. योग्य कारण नसतांना नमाजपठण चुकवणार्या कर्मचार्यांना प्रथम ताकीद देण्यात येईल; मात्र या गुन्ह्याची पुनरावृत्ती केल्यास त्यांना योग्य ती शिक्षा देण्यास बांधील आहे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
४. नमाजपठण केले नाही, तर शिक्षा काय असेल, हे तालिबानने स्पष्ट केलेले नाही. कर्मचार्यांना कामकाजाच्या वेळेत नमाजासाठी उपस्थित राहण्याचा आदेश कसा पाळला जाईल, हेही तालिबानने स्पष्ट केलेले नाही.