Swati Maliwal Case : मुख्‍यमंत्री निवासात अशा गुंडांनी काम करावे का ?    

खासदार स्‍वाती मालीवाल यांना मारहाण करणार्‍या मुख्‍यमंत्री केजरीवाल यांच्‍या स्‍वीय सचिवाला सर्वोच्‍च न्‍यायालयाने फटकारले !  

आपच्‍या राज्‍यसभा सदस्‍या स्‍वाती मालीवाल व केजरीवाल यांचे स्‍वीय सचिव बिभव कुमार

नवी देहली – आम आदमी पक्षाच्‍या राज्‍यसभा सदस्‍या स्‍वाती मालीवाल यांच्‍यावर मुख्‍यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्‍या शासकीय बंगल्‍यावर झालेल्‍या मारहाणीच्‍या प्रकरणी सर्वोच्‍च न्‍यायालयाने मुख्‍यमंत्री केजरीवाल यांचे स्‍वीय सचिव बिभव कुमार यांना खडसावले. सर्वोच्‍च न्‍यायालयाने म्‍हटले, ‘तो (बिभव कुमार) मुख्‍यमंत्र्यांच्‍या सरकारी निवासस्‍थानात गुंड घुसल्‍याप्रमाणे वागला.’ न्‍यायालयाने बिभव कुमार यांच्‍या अधिवक्‍त्‍यांना विचारले, ‘मुख्‍यमंत्र्यांचे निवासस्‍थान खासगी बंगला आहे का ? अशा गुंडांनी मुख्‍यमंत्र्यांच्‍या निवासस्‍थानात काम करावे का ?’

१. न्‍यायालयाने पुढे म्‍हटले की, खुनी आणि दरोडेखोर यांना जामीन मिळू शकतो; मात्र मालीवाल प्रकरणात बिभव कुमार यांच्‍यावरचे आरोप आम्‍ही उघडपणे वाचू इच्‍छित नाही. मालीवाल यांनी बिभवला त्‍यांच्‍या शारीरिक त्रासामुळे ‘मारहाण करू नका’, असे आवाहन केले होते, तेव्‍हाही हा माणूस थांबला नाही. तो काय विचार करत होता, त्‍याच्‍या डोक्‍यात सत्ता गेली होती का ?

२. मालीवाल यांनी केलेल्‍या तक्रारीनंतर बिभव कुमार याला अटक करण्‍यात आली आहे. तेव्‍हापासून तो अटकेतच आहे. कनिष्‍ठ, सत्र आणि उच्‍च न्‍यायालय यांनी जामीन अर्ज फेटाळल्‍यानंतर त्‍याने सर्वोच्‍च न्‍यायालयात अर्ज केला आहे. त्‍यावर सुनावणी चालू आहे.

संपादकीय भूमिका

सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या या  फटकावण्‍यातून आम आदमी पक्षाची पात्रता उघड होते !