Hindu Opposed Muslims Shops : हिंदु भाविकांसाठी असलेल्‍या इमारतीच्‍या आवारातील दुकाने अन्‍य धर्मियांना चालवण्‍यासाठी देण्‍यास हिंदु संघटनांचा विरोध !

पलानाडू (आंध्रप्रदेश) येथील घटना

धर्मादाय विभागाच्‍या अधिकार्‍यांना निवेदन देतांना हिंदु संघटनांचे कार्यकर्ते

पलानाडू (आंध्रप्रदेश) – येथील संत आणि भाविक यांना रहाण्‍यासाठी बांधण्‍यात आलेल्‍या इमारतीच्‍या आवारातील दुकाने अन्‍य धर्मियांना देण्‍याच्‍या विरोधात हिंदु संघटनांनी आंदोलन छेडले आहे. त्‍यांनी इमारतीच्‍या भोवती असलेल्‍या अन्‍य धर्मियांना हटवण्‍याची मागणी केली आहे.

धर्मादाय विभागाच्‍या अधिकार्‍यांना निवेदन देतांना हिंदु संघटनांचे कार्यकर्ते

१.  १०० वर्षांपूर्वी पलानाडू जिल्‍ह्यातील पिदुगुरल्ला गावात एका मोठ्या व्‍यावसायिकाने गावात येणारे आणि तीर्थक्षेत्राला जाणारे संत आणि भाविक यांना रहाण्‍याची, भोजनाची व्‍यवस्‍था करण्‍यासाठी एक इमारत बांधली होती.

२. पुढे ही इमारत सरकारच्‍या धर्मादाय विभागाने कह्यात गेली. या इमारतीच्‍या आवारात बांधलेली दुकाने प्रत्‍येक ३ वर्षांसाठी लिलावाद्वारे भाडेतत्त्वावर देण्‍यात येते. लिलावात इतर धर्मियांना सहभागी होण्‍याची अनुमती नाही. तसेच हिंदूंनी लिलावात दुकान घेऊन ते अन्‍य धर्मियांना चालवण्‍यास देण्‍याचाही नियम नाही.

३. असे असतांना २ दुकाने हिंदूंनी लिलावात घेऊन ती मुसलमानांना चालवण्‍यास दिली आहेत. (हिंदूंना सातत्‍याने सर्वधर्मसमभावाचे डोस पाजल्‍यामुळे हिंदू अशी गांधीगिरी करतात आणि भविष्‍यात ही त्‍यांच्‍या मुळावर उठते, हे आतापर्यंतचा इतिहास आहे ! – संपादक) याला हिंदु जनजागृती समिती, राष्‍ट्रीय शिवाजी सेना, वानरसेना आणि हिंदु देवालय परिरक्षण समिती अशा विविध हिंदु संघटनांनी संघटित होऊन तीव्र विरोध केला आहे.

४. त्‍यांनी येथील मुसलमानांना तातडीने हटवण्‍याची विनंती धर्मादाय विभागाला निवेदन देऊन केली.

५. येत्‍या महिनाभरात म्‍हणजेच ऑगस्‍ट महिन्‍यात पुन्‍हा लिलाव होणार असून त्‍यात इतर धर्मियांना कोणत्‍याही परिस्‍थितीत संधी देऊ नये आणि तेथे उपस्‍थित असलेल्‍या इतर धर्मियांना तात्‍काळ हटवावे, अशी मागणी करण्‍यात आली आहे.

६. धर्मादाय विभागाच्‍या नियमांच्‍या विरोधात जाऊन लांगूलचालनाचे धोरण स्‍वीकारून अल्‍पसंख्‍यांकांना दुकाने दिली गेली, तर सर्व हिंदु संघटना राज्‍यभर मोठे आंदोलन उभारतील, असा निर्धार या वेळी करण्‍यात आला.