भारतावर सूड उगवण्यासाठी सार्वजनिक केली महत्त्वपूर्ण माहिती
मॉस्को – पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या मॉस्को दौर्यामुळे युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेंस्की (Volodymyr Zelenskyy) यांनी नाराजी व्यक्त केली होती. भारताने रशिया-युक्रेन युद्धासाठी रशियाला दम न भरता उलट त्याच्याशी जवळीक वाढवल्यामुळे भारताचा सूड उगवण्यासाठी युक्रेनच्या सायबर चाच्यांनी (हॅकर्सनी) भारताच्या संरक्षणाशी निगडित अत्यंत गोपनीय माहिती उघड केली आहे. १५ जुलै या दिवशी युक्रेनच्या सायबर चाच्यांनी (हॅकर्सनी) एस्-४०० क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीचे अत्यंत गोपनीय तपशील उघड केल्याचा दावा केला आहे. रशियाने भारताला एस्-४०० प्रणालीच्या ४०० कि.मी. पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा पुरवठा चालू केल्यानंतर हॅकर्सनी ही माहिती उघड केली. या गोपनीय माहितीचा लाभ चीन आणि पाकिस्तान सारखे भारताचे शत्रू घेऊ शकतात.
१. रशियाने या कराराची संपूर्ण माहिती भारताला ईमेलद्वारे पाठवली होती. युक्रेनच्या सायबर चाच्यांनी हा ईमेल हॅक करून भारतात पाठवल्या जाणार्या अनेक शस्त्रांस्त्रांचा तपशील मिळवला.
२. भारताने किती क्षेपणास्त्रे खरेदी केली आणि कोणती उपकरणे खरेदी केली, याविषयीची माहिती सार्वजनिक करण्यात आली आहे.
३. भारताने वर्ष २०१८ मध्ये एस्-४०० क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीसाठी करार केला होता. भारत आणि रशिया यांच्यातील संरक्षण संबंधांच्या दिशेने हे एक मोठे पाऊल असल्याचे म्हटले गेले होते. हा संपूर्ण करार ५ अब्ज डॉलर्सचा आहे. सध्या भारताला ३ एस्-४०० संरक्षणयंत्रणा मिळाली असून युक्रेन युद्धामुळे उर्वरित २ एस्-४०० पुरवण्यात रशियाला अडथळा येत आहे.
४. युक्रेनच्या हॅकर्सचा हा दावा खरा ठरल्यास भारताला तो मोठा धक्का आहे. पाकिस्तान आणि चीन यांच्याशी सामना करण्यासाठी भारताने ही यंत्रणा खरेदी केली आहे; पण आता शत्रूंना याची माहिती मिळाली आहे.
संपादकीय भूमिकाजर युक्रेन असे कुकृत्य करून भारतावर सूड उगवत असेल, तर भारतानेही त्याला ‘जशास तसे’ उत्तर द्यावे ! |