Taliban Rejected POK : तालिबानने पाकव्याप्त काश्मीरला पाकचा भाग मानले नाही !

काबूल (अफगाणिस्तान) – सत्ताधारी तालिबानने पाकव्याप्त काश्मीरवर पाकिस्तानचा दावा मान्य करण्यास नकार दिला आहे. तालिबानने ३ दशकांत प्रथमच अफगाणिस्तानच्या सीमांचे मूल्यांकन केले आहे. तालिबानच्या ‘सीमा आणि आदिवासी व्यवहार मंत्रालया’ने सांगितले की, त्यांनी पाकिस्तान, ताजिकिस्तान, जम्मू-काश्मीर आणि चीन यांना लागून असलेल्या अधिकृत सीमांचे मूल्यांकन केले आहे.


विशेष म्हणजे तालिबान मंत्रालयाने या निवेदनात जम्मू-काश्मीरसाठी ‘पाकव्याप्त काश्मीर’ असा उल्लेख केलेला नाही. याचा अर्थ तालिबान मंत्रालय पाकव्याप्त काश्मीरवरील पाकिस्तानचा दावा मान्य करत नाही.

तालिबानच्या या निर्णयामुळे अफगाणिस्तानची सीमा थेट भारताच्या जम्मू- काश्मीर क्षेत्राला जोडली जाईल. यामुळे दोन्ही देशांचे थेट शेजारी संबंध प्रस्थापित होतील. भारताचीही याविषयी तीच अधिकृत भूमिका आहे. भारत काश्मीरद्वारे अफगाणिस्तानला शेजारी मानतो.

संपादकीय भूमिका

तालिबानने हा चांगला निर्णय घेतला आहे, आता त्याने पाकला पाकव्याप्त काश्मीर भारताला परत देण्यासाठीही दबाव आणावा !