छत्रपती संभाजीनगर – कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड येथे झालेल्या घटनेचा निषेध करण्यासाठी ‘एम्.आय.एम्.’ने १९ जुलै या दिवशी दुपारी येथील विभागीय आयुक्तालयासमोर निदर्शने केली. या वेळी सकाळपासूनच मोठा पाेलीस बंदोबस्त तैनात होता. आंदोलन शांततेत झाल्यानंतर त्याला गालबोट लावण्याचा प्रयत्न मुसलमानांनी केला. या हुल्लडबाज मुसलमानांना पोलिसांनी पिटाळत त्यांचा प्रयत्न उधळून लावला. निदर्शने शांततेत झाल्यानंतर माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली ५ जणांचे शिष्टमंडळ विभागीय आयुक्तांना निवेदन देण्यासाठी जात होते. त्या वेळी मुसलमान तरुणांच्या टोळक्याने घोषणा देण्यास प्रारंभ केला.