गडचिरोली – गडचिरोली जिल्हा नक्षलवाद्यांचे मुख्य ठिकाण आहे. वर्षभरात नक्षलवादी आणि पोलीस यांच्यात अनेक चकमकी झाल्या आहेत. वर्ष २००० पासून २९९ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना यश आले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांविरोधात आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई १७ जुलै या दिवशी करण्यात आली. नक्षलवादी आणि पोलीस यांच्यात झालेल्या चकमकीत १२ नक्षलवादी ठार झाले. विशेष म्हणजे या चकमकीत २५ लाखांहून अधिक पारितोषिक असलेला नक्षलवादी डी.व्ही.सी.एम्. लक्ष्मण मारला गेला आहे. यात नक्षलवाद्यांकडून अनेक स्वयंचलित शस्त्रे जप्त करण्यात आली; मात्र पोलिसांनी केलेली कारवाई ही पहिली नाही. याआधी नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात पोलिसांना आणि सुरक्षा दलाला यश आले आहे.
संपादकीय भूमिका :कित्येक दशकांपासून चालू असलेला माओवाद आणि नक्षलवाद संपवू न शकणे, हे आतापर्यंतच्या शासनकर्त्यांचे अपयश ! |